Sunday, September 07, 2025 02:25:21 PM

Bengaluru Auto driver Emotional Video : चिमुकल्या काळजाच्या तुकड्याला मांडीवर घेऊन रिक्षा चालवणाऱ्या पित्याचा Video Viral

बेंगळुरूमधील एका ऑटो ड्रायव्हरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या लहान मुलीला मांडीवर घेऊन रस्त्यावर ऑटो चालवत आहे.

bengaluru auto driver emotional video  चिमुकल्या काळजाच्या तुकड्याला मांडीवर घेऊन रिक्षा चालवणाऱ्या पित्याचा video viral

Bengaluru Auto Driver Viral Video : आई-वडील हे मुलांच्या आयुष्यातील खूप महत्त्वाच्या व्यक्ती असतात. ते आपले संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांना चांगले जीवन देण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात. ते स्वतः अनेक संकटांनी वेढलेले असले तरीही. ते आपल्या मुलांना फुलासारखे जपतात. अशाच एका वडिलांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक ऑटोरिक्षा चालक आपल्या चिमुकल्या मुलीला मांडीवर बसवून ड्रायव्हिंग करताना दिसत आहे. या रिक्षा चालकाने या मुलीला बेबी कॅरिअर बॅगमध्ये बसवून पोटाशी बांधले आहे.

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आणि महागाईमुळे बहुतेकांच्या आई आणि वडील अशा दोघांनाही पैसे कमवण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे मुले लहान असताना त्यांना सांभाळणे ही दोघांसाठीही तारेवरची कसरत असते. मुलांना सांभाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे शक्य नसेल किंवा तशी व्यवस्था केलेली असली तरीही मुलांना आई-वडिलांची गरज असतेच. अशाच परिस्थिती रिक्षा चालक असलेल्या वडिलांनी स्वतःचे काम करत असतानाच मुलीचीही जबाबदारी स्वीकरलेली आहे. बंगळुरु येथील हा व्हिडिओ आहे.

हेही वाचा - आता Whatsappवरून काही मिनिटांत डाउनलोड करता येते Aadhaar Card; जाणून घ्या, सोपी पद्धत

मुलांची काळजी घेणे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे या दोन्हीही अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. रिक्षा चालक असलेले वडील स्वतःची भूमिका खूप चांगल्या प्रकारे निभावत आहेत. हा व्हिडिओ बेंगळुरूच्या एका महिलेने इंस्टाग्रामवर शेअर केला होता आणि तो खूप वेगाने व्हायरल झाला. या वडिलांचे कठोर परिश्रम, जबाबदारीची जाणीव, मुलीविषयीचे प्रेम आणि त्यांचे समर्पण पाहून लोक भावनिक होत आहेत. या रिक्षा चालकावर लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

व्हायरल व्हिडिओ पहा


हा व्हिडिओ @rithuuuuuu._ नावाच्या वापरकर्त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. महिलेने व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिले आहे, 'ते पैसे कमवण्यासाठी गाडी चालवतात, पण त्याच्या मांडीवर असे कोणीतरी आहे, ज्याच्यासाठी ते कमवत आहेत.'
'फक्त एक वडील हे करू शकतात'

हेही वाचा - Weight Loss Bonus Reward : वजन कमी करण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला 1.2 कोटींचा बोनस

व्हिडिओने लोकांना भावनिक केले. एका वापरकर्त्याने लिहिले, 'तुम्ही नेहमीच यशस्वी व्हाल.' तर दुसऱ्याने म्हटले, 'माझे वडील देखील अशीच ऑटो चालवायचे. तुमची आठवण येते बाबा.' एका वापरकर्त्याने त्याचे कौतुक केले आणि लिहिले, 'एखादा माणूस त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी काय काय करत नाही?' आणखी एकाने लिहिले, 'वडील खरोखरच सुपरहिरो असतात. हे फक्त वडीलच करू शकतात.'


सम्बन्धित सामग्री