मुंबई: बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान चर्चेत आहे. आर्यन खान दिग्दर्शित 'द बॅड*स ऑफ बॉलिवूड' चित्रपटाचा प्रिमियर बुधवारी सायंकाळी एनएमएसीसी, मुंबई येथे पार पडला. यादरम्यान, 'द बॅड*स ऑफ बॉलिवूड' चित्रपटाच्या प्रिमियरसाठी अभिनेते, अभिनेत्री आणि अंबानी कुटुंबीयांसह, अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित होते. मात्र, चित्रपटाच्या प्रिमियरसाठी आर्यन खानची गर्लफ्रेंड लारिसा बोनेसीही उपस्थित होती. लारिसा बोनेसी सर्वांचे लक्ष वेधून घेतली होती.
कोण आहे लारिसा बोनेसी?
लारिसा बोनेसी एक ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. यासोबतच, ती सध्या बॉलीवूडमध्ये करिअर करत आहे. लारिसा वयाच्या 13 व्या वर्षी चीनला गेली, जिथे तिने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. इतकच नाही तर 2011 मध्ये लारिसाने 'देसी बॉईज' मधील 'सुबा होने ना दे' या गाण्यातून बॉलिवूड जगतात पदार्पण केले. यासह, तिने तेलगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे. किंगखान शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि लारिसाला अनेक वेळा पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. त्यामुळे, त्यांच्या डेटिंगच्या चर्चा आजही सुरू आहे.
सोशल मीडियावर लारिसा अभिनेता शाहरुख खानच्या सर्व कुटुंबीयांना फॉलो करते. त्यामुळे, त्यांच्या नात्यांबद्दल सतत चर्चा सुरू असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लारिसा आर्यनपेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. आर्यन 27 वर्षांचा आहे तर लॅरिसा 31 वर्षांची आहे. माहितीनुसार, लारिसाची एकूण संपत्ती सुमारे 171 कोटी असल्याचे म्हटले जाते. 2025 या वर्षाच्या सुरुवातीच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईत एका पार्टी झाली होती. यात पार्टीत आर्यन खान आणि लारिसा बोनेसी दोघे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत होते. तेव्हापासून दोघांच्या लिंकअपची चर्चा होऊ लागली.