Tuesday, September 16, 2025 04:16:43 PM

Farah Khan on Baba Ramdev : फराह खानने केली रामदेव बाबांची सलमान खानशी तुलना, म्हणाली, 'स्वत: झोपडीमध्ये राहतो आणि...'

फराह खान अनेक सेलिब्रिंच्या घरी जाते आणि तिच्या यूट्यूब चॅनेलसाठी शेफ दिलीपसोबत स्वयंपाकाचे व्लॉग बनवते. नुकताच, बाबा रामदेव यांना भेटण्यासाठी फराह खान शेफ दिलीपसोबत त्यांच्या आश्रमात पोहोचली.

farah khan on baba ramdev  फराह खानने केली रामदेव बाबांची सलमान खानशी तुलना  म्हणाली स्वत झोपडीमध्ये राहतो आणि

मुंबई: दिग्दर्शिका आणि कोरियोग्राफर फराह खान अनेक सेलिब्रिंच्या घरी जाते आणि तिच्या यूट्यूब चॅनेलसाठी शेफ दिलीपसोबत स्वयंपाकाचे व्लॉग बनवते. नुकताच, बाबा रामदेव यांना भेटण्यासाठी फराह खान शेफ दिलीपसोबत त्यांच्या आश्रमात पोहोचली. यासह, फराह खानने बाबा रामदेवसोबत संवाद साधला. यादरम्यान, फराह खानने अभिनेता सलमान खान आणि बाबा रामदेव यांची तुलना केली. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

बाबा रामदेव यांच्याशी संवाद साधताना फराह खान म्हणाली की, 'तुम्ही आणि सलमान खान एकसारखे आहात. सलमान खान 1बीएचके मध्ये राहतो आणि बाकी सर्वांसाठी महाल बनवतो'. फराह खानने केलेल्या हास्यास्पद विनोदावर रामदेव बाबा आणि फराह खान खळखळून हसले. 

फराह खानच्या यूट्यूब व्लॉगमध्ये, बाबा रामदेव फराह खानला त्यांचा आश्रम दाखवताना दिसत आहेत. यादरम्यान, बाबा रामदेव त्यांच्या साध्या जीवनशैलीबाबत बोलताना दिसत आहेत. यासह, बाबा रामदेव म्हणाले की, 'आम्ही लोकांना राहण्यासाठी महाल ठेवला आहे आणि स्वत:साठी झोपडी'. यावर, फराह खान हसत हसत म्हणाली की, 'तुम्ही आणि सलमान खान एकसारखे आहात'. यावर बाबा रामदेव हसले आणि म्हणाले की, 'ही गोष्ट मात्र खरी आहे'.

सध्या, फराह खान तिच्या यूट्यूबवर खूप सक्रिय आहे. शेफ दिलीपसोबत फराह खान विविध सेलिब्रिंच्या घरी जाते आणि स्वयंपाकाचे व्लॉग बनवते. तिच्या यूट्यूब चॅनेलवरील फूड व्लॉगसंबंधीत व्हिडिओला प्रेक्षक लाखोंच्या संख्येने पाहतात. फराह खानच्या यूट्यूब चॅनेलवर 2.17 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत. यासोबतच, फराह खानच्या इंस्ट्राग्रामवर 4.4 मिलियन फॉलेवर्स आहेत. काही दिवसांपूर्वी फराह खानने अशनीर आणि माधुरी ग्रोवर यांच्या घरी भेट दिली होती. या व्हिडिओला 3.4 मिलियन लोकांनी पाहिले. 


सम्बन्धित सामग्री