Bigg Boss 19: बिग बॉस 19 ऑगस्ट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याआधीच संभाव्य स्पर्धकांच्या यादीवर जोरदार चर्चा रंगू लागली आहे. यंदाच्या मोसमात टेलिव्हिजन, बॉलिवूड, सोशल मिडिया आणि इन्फ्लुएंसर जगतातील दिग्गज चेहरे बिग बॉसच्या घरात पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या मोसमात 15 स्पर्धकांची सुरुवात, नंतर वाइल्ड कार्ड एन्ट्री
या हंगामात सुरुवातीला 15 स्पर्धक असतील आणि त्यानंतर 3 ते 5 वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची माहिती आहे. नेहमीप्रमाणे नाट्यपूर्ण वागणूक, भांडणं, गटबाजी, अनपेक्षित मैत्री व रोमांचक टास्कमुळे हा हंगाम चर्चेचा विषय ठरणार आहे.
कोण आहेत संभाव्य स्पर्धक?
-राम कपूर आणि गौतमी कपूर; लोकप्रिय टीव्ही कपल एकत्र घरात एन्ट्री घेण्याची शक्यता.
-धीरज धूपर, अलिशा पनवार, अनिता हसनंदानी, लता सबरवाल, मुनमुन दत्ता, खुशी दुबे, शरद मल्होत्रा, कनिका मान, पारस कलनावत हे टीव्ही क्षेत्रातील नावाजलेले चेहरे आहेत.
-अशिष विद्यार्थी, डेजी शाह, तनुश्री दत्ता, ममता कुलकर्णी, राज कुंद्रा यांच्यासारखे बॉलिवूडशी संबंधित आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्वही चर्चेत आहेत.
-गौरव तनेजा, अपूर्वा मुखीजा, चिंकी मिंकी, पुरव झा, मिकी मेकओव्हर, अरशिफा खान, मिस्टर फैसू, कृष्णा श्रॉफ हे सोशल मिडिया आणि डिजिटल विश्वातील प्रसिद्ध इन्फ्लुएंसर आहेत.
यंदा होणार होस्टिंगमध्येही मोठा बदल
सदर हंगामात होस्टिंग क्षेत्रात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. सलमान खान शोची सुरुवात करणार असले तरी, ते फक्त पहिल्या तीन महिन्यांसाठी होस्टिंग करतील. त्यानंतर फराह खान, करण जोहर आणि अनिल कपूर हे तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होस्टिंग करणार आहेत. मात्र, सलमान खान ग्रँड फिनालेसाठी पुन्हा परतणार आहेत.
डिजिटल-फर्स्ट स्वरूपात प्रसारण
यंदाचा हंगाम डिजिटल-फर्स्ट धोरणावर आधारित असणार आहे. शोच्या भागांचे प्रसारण आधी JioCinema वर होणार असून, त्यानंतर सुमारे 90 मिनिटांच्या अंतराने Colors TV वर ते दाखवले जाणार आहेत.
प्रसिद्धी, वाद, नाट्य आणि मनोरंजन यांचं परफेक्ट मिश्रण असलेला बिग बॉस 19, हे प्रेक्षकांसाठी जबरदस्त मनोरंजन घेऊन येणार यात शंका नाही. अंतिम स्पर्धकांची यादी ऑगस्टच्या अखेरीस जाहीर होणार आहे.