Chhaava Collection : ‘छावा’ची सुपर ग्रँड ओपनिंग! विकी कौशलच्या चित्रपटाने मोडले अनेक रेकॉर्ड
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ग्रँड ओपनिंग केली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या छावा चित्रपटाने पहिल्या दिवशी कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडित काढले आहेत. या चित्रपटाने आपेक्षेप्रमाणे बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी जोरदार कमाई केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
छावा चित्रपटाने शुक्रवार म्हणजे पहिल्या दिवशी 31 करोड रूपयांची कमाई केली आहे. विकी कौशलच्या करियरमध्ये, बंपर ओपनिंग करणारा हा चित्रपट ठरला आहे. याआधी विकी कौशलच्या बँड न्यूज आणि उरी या चित्रपटाने ८ करोड रूपयांची ओपनिंग केली होती.
हेही वाचा - 'हम आपके हैं कौन' चित्रपटासाठी माधुरी नव्हे तर 'या' अभिनेत्रीला दिली होती पसंती; दिग्दर्शकाने सांगितला किस्सा
लोकांच्या पसंतीस उतरला ‘छावा’
छावा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून आज शनिवारी चित्रपटाची कमाई वाढण्याची शक्यता आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर पोस्ट करून चित्रपट कसा आहे, ते सांगत आहेत. याचा फायदा चित्रपटासाठी नक्कीच होणार आहे. यात प्रेक्षकांनी विकी कौशल, अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना यांच्यासह इतर कलाकारांचं काम जबरदस्त असल्याचं सांगत चित्रपट आवर्जून पहावा असे आवाहन करत आहेत.
छावाने अॅडव्हान्स बुकिंगमधून चांगली कमाई केली होती. त्यानंतर आता पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, छावाने पहिल्या दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी तब्बल १३० कोटी रुपये खर्च केले आहेत. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता लवकरच तो बजेटची रक्कम वसूल करेल, असं चित्र आहे.
हेही वाचा - रिंकू राजगुरू होणार कोल्हापूरची सून?, कृष्णराज महाडिकांसोबतचा फोटो व्हायरल, चर्चांना उधाण
छावा बंपर कमाईसह 2025 या वर्षात पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. याआधी हा विक्रम अक्षय कुमारच्या स्काय फोर्सच्या नावे होता. स्काय फोर्सने पहिल्या दिवशी 15 करोड 30 लाख रूपयांचा बिझनेस केला होता. आता छावाची जादू बॉक्स ऑफिसवर चालली आहे. हा चित्रपट पहिल्या आठवड्यात 100 कोटींचा आकडा पार करेल, असं मत चित्रपट विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.
छावा चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्यासह विनित सिंह, आशुतोष राणा, संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, सारंग साठ्ये, शुभांकर एकबोटे, डाएना पेंटी, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, रोहीत पाठक या कलाकारांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.