Wednesday, August 20, 2025 09:19:31 AM

राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘छावा’च्या दिग्दर्शकांची स्पष्टोक्ती

'छावा' चित्रपटाच्या काही सीनवर आक्षेप केला जात होता मात्र आता 'छावा'च्या दिग्दर्शकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीच्या चर्चेअंती चित्रपटाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘छावा’च्या दिग्दर्शकांची स्पष्टोक्ती

मुंबई: चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा' या चित्रपटातील वादग्रस्त लेझीम नृत्याच्या सीनबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उतेकरांनी सांगितले की, "त्या सीनमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास, आम्ही तो काढून टाकू."

उतेकरांनी याबाबत अधिक सांगितले, "चित्रपटातील या दृश्यात आमचा कोणता वाईट हेतू नव्हता, पण जर या सीनने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील  तर आम्ही तो डिलिट करणार आहोत. या सीनच्या काढण्यामुळे चित्रपटावर फारसा प्रभाव पडणार नाही, कारण तो एक छोटा भाग आहे."

इतिहासावर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल उतेकरांनी आपल्या टीमच्या चार वर्षांच्या कठोर संशोधनाचे महत्त्व सांगितले. "चित्रपटाचा उद्देश छत्रपती संभाजी महाराजांच्या महानतेला उजाळा देणे आहे. जर काही गोष्टींच्या कारणाने चित्रपटाची विश्वसनीयता कमी होत असेल, तर त्या गोष्टी काढण्यास आम्ही तयार आहोत,कारण लेझीम हा प्रकार चित्रपटापेक्षा किंवा महाराजांपेक्षा मोठा नाही " असं उतेकर म्हणाले. 


जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.


सम्बन्धित सामग्री