Friday, September 12, 2025 03:53:16 PM

Karishma Sharma Accident : चालत्या ट्रेनमधून पडली अभिनेत्री, रुग्णालयातील फोटो व्हायरल, कशी आहे आता तब्येत ?

1 सप्टेंबर रोजी करिश्माने मुंबईत अचानक लोकल ट्रेनमधून उडी मारली, ज्यामुळे तिच्या डोक्याला आणि पाठीला दुखापत झाली.

karishma sharma accident  चालत्या ट्रेनमधून पडली अभिनेत्री रुग्णालयातील फोटो व्हायरल कशी आहे आता तब्येत

'प्यार का पंचनामा २', 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' आणि 'उजडा चमन' सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री करिश्मा शर्मा नुकताच एक गंभीर अपघात झाला आहे.  बुधवार, 11 सप्टेंबर रोजी करिश्माने मुंबईत अचानक लोकल ट्रेनमधून उडी मारली, ज्यामुळे तिच्या डोक्याला आणि पाठीला दुखापत झाली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघाताची माहिती स्वत: अभिनेत्रीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले की, "तिने साडी नेसली होती आणि चर्चगेट येथे शूटिंगसाठी ट्रेन पकडण्यासाठी गेली होती. ट्रेनचा वेग वाढताच लक्षात आले मैत्रिण ट्रेनपर्यंत पोहोचू शकत नाहीत. घाबरून तिने चालत्या ट्रेनमधून उडी मारली आणि पाठीवर पडले. यादरम्यान डोकेही जमिनीवर आदळले". 

हेही वाचा - Crime in Extra Marital Affair: अनैतिक संबंधातून घडला भयानक प्रकार, पतीचा खून करायला आले पण बॉयफ्रेंडचा... 

पुढे ती म्हणाली की, "पाठीवर आणि कंबरेवर जखमा आहेत, डोक्यावर सूज आहे आणि शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आहेत. डोक्यावर गंभीर दुखापत आहे का हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांनी एमआरआय करण्याचा सल्ला दिला आहे". त्याचप्रमाणे चाहत्यांना लवकर बरे व्हावी यासाठी प्रार्थनादेखील करायला सांगितली आहे. 

हेही वाचा - CP Radhakrishnan Oath Ceremony : सी पी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ 

दरम्याने अभिनेत्रीच्या एका मैत्रीणीने करीश्माचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करीश्माला सलाईन लावलेली दिसत आहे. तसेच तिची तब्येत एकदम नाजूक असल्याचे दिसून येत आहे. करीश्मा लवकर बरी व्हावी अशी प्रार्थनादेखील करायला सांगत आहेत. 


सम्बन्धित सामग्री