Monday, September 01, 2025 05:38:39 PM

'हे' आहेत भारतातील प्रसिद्ध यूट्यूबर्स ज्यांची कमाई ऐकून व्हाल हैराण. जाणून घ्या

भारतात काही असे देखील यूट्यूबर्स आहेत ज्यांची कमाई कोटींपेक्षा अधिक आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते प्रसिद्ध यूट्यूबर्स.

हे आहेत भारतातील प्रसिद्ध यूट्यूबर्स ज्यांची कमाई ऐकून व्हाल हैराण जाणून घ्या

2008 साली भारतामध्ये यूट्यूबची ऍपची स्थापना झाली. ज्याच्यामुळे सर्वांना यूट्यूबबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्यामुळे अनेक नामवंत म्युजिक कंपन्या, कलाकार, आणि त्यासोबतच अनेक जणांनी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या म्युजिक व्हिडिओ, इतर व्यावसायिक, मनोरंजक आणि आकर्षक व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट करून प्रसिद्धी मिळवू लागले. या प्रसिद्धीमुळे आणि एक लाख सब्सक्राइबर्स झाल्यामुळे त्यांना यूट्यूबकडून बक्षीस मिळू लागले आणि त्यासोबतच त्यांच्या कमाईदेखील होण्यास सुरुवात झाली. ज्यामुळे अलीकडच्या काळात आपल्याला युट्यूब वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचेदेखील पाहायला मिळाले. 
मात्र भारतात काही असे देखील यूट्यूबर्स आहेत जे त्यांच्या आकर्षक व्हिडिओमुळे जगभरात प्रसिद्ध तर झालेच आहेत आणि त्यासोबत त्यांची कमाई देखील लाखांपेक्षा अधिक आहेत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते प्रसिद्ध यूट्यूबर्स. 

1 - कॅरीमिनाटी: 
अजय नागर उर्फ कॅरीमिनाटी हा मूळचा भारतातील फरिदाबादचा असून त्याने २०१४ पासून यूट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पोस्ट करायला सुरुवात केली. कॅरीमिनाटीचे यूट्यूबवर 4 कोटी 50 लाख पेक्षा अधिक सब्सक्राइबर्स आहेत. कॅरीमिनाटी आपल्या अनोख्या शैली आणि व्हिडिओ कंटेंटमुळे प्रसिद्ध होऊ लागला. कॅरीमिनाटी त्याच्या यूट्यूबवर लाइव गेमिंग यासोबतच त्याने गेमिंग व्यतिरिक्त गाणी, आणि कॉमेडी कंटेंटसाठी देखील प्रसिद्ध होऊ लागला. त्याच्या यूट्यूब व्हिडिओमुळे त्याच्या चाहत्यांची संख्यादेखील वाढू लागली. त्यामुळे त्याची प्रसिद्ध यूट्यूबर म्हणून ओळख निर्माण झाली. सध्या तो अनेक शो मध्ये आपल्याला जज म्हणून देखील पाहायला मिळत आहे. सूत्रांनुसार कॅरीमिनाटीची मासिक कमाई 25 लाख रुपये इतकी असून त्याची वार्षिक कमाई 4 कोटींपेक्षा अधिक आहे. 

2 - भुवन बाम:

भुवन बाम याचा जन्म 22 जानेवारी 1994 रोजी गुजरातमधील वडोदरा येथे एका मराठी हिंदू कुटुंबात झाला. त्याने शिक्षण दिल्लीतील ग्रीन फील्ड्स स्कूलमध्ये पूर्ण झाले आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग कॉलेजमधून इतिहास या विषयामध्ये त्याने पदवी प्राप्त केली. 2015 मध्ये त्याने यूट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पोस्ट करायला सुरुवात केली. त्याच्या बीबी की वाईन्स या  यूट्यूब शोमुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येमध्ये वाढ होऊ लागली. या शोमध्ये त्याने अनेक जगप्रसिद्ध कलाकारांसोबत हास्यविनोदक पद्धतीने मुलाखत घेतल्यामुळे अनेकजण त्याच्यासोबत काम करू लागले. सध्या भुवन बाम आपल्याला अनेक वेब सिरीजमध्ये पाहायला मिळत आहे. सूत्रांनुसार भुवन बाम याची मासिक कमाई 112 कोटी असून त्याची कमाई 15 दशलक्ष पेक्षा अधिक आहे. 

3 - आशिष चंचलानी:

आशिष चंचलानी याचा जन्म 8 डिसेंबर 1993 रोजी महाराष्ट्रातील उल्हासनगर मध्ये झाला. आशिष चंचलानीने 2014 पासून यूट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे हास्यविनोदी व्हिडिओज पोस्ट करायला सुरुवात केली. त्याच्या कॉमेडी व्हिडिओजमुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली असून त्याच्या यूट्यूबवर 30 दशलक्षपेक्षा अधिक सब्सक्राइबर्स आहेत. सध्या आशिष चंचलानी अनेक वेब सिरीज आणि विविध कार्यक्रमामध्ये काम करत असून त्याची मासिक कमाई 40 लाख 11 हजार 860 ते 1 कोटी 20 लाख 35 हजार रुपयांपेक्षा अधिक आहे.


सम्बन्धित सामग्री