मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे.सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. महाराष्ट्राची अप्सरा म्हणून सिनेसृष्टीत तिची ओळख आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सोनालीने लाल रंगाची साडी आणि हिरवा ब्लॉऊज परिधान केला आहे. लाल साडीवर साजेसी ज्वेलरी आणि लाल बांगड्या घातल्या आहेत. या पोस्टला तिने 'शादी रेडी' असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टवर सगळ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.
सोनाली तिच्या आयुष्यातील सुंदर क्षण प्रेक्षकांसोबत शेअर करत असते. सोनालीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसून येतात. प्रेक्षक त्यांचे प्रेम कमेंटच्या माध्यमातून तिच्यापर्यंत पोहोचवत असतात.
लाल साडीवर सोनालीने एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिच्या लाल साडीतील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
https://whatsapp.com/channel/0029Va9QJRHFSAt2p8b9Cx3t