Monday, September 01, 2025 01:30:10 AM

माधुरी दीक्षितचा मुलगा अरिन झाला पदवीधर; श्रीराम नेने यांनी शेअर केले सोहळ्यातील खास फोटो

आपल्या उत्कृष्ट नृत्यकौशल्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांचा मुलगा अरिन नेने आता पदवीधर झाला आहे.

माधुरी दीक्षितचा मुलगा अरिन झाला पदवीधर श्रीराम नेने यांनी शेअर केले सोहळ्यातील खास फोटो

मुंबई: आपल्या उत्कृष्ट नृत्यकौशल्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांचा मुलगा अरिन नेने आता पदवीधर झाला आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठातून अरिनने पदवी पूर्ण केली आहे. यादरम्यान, संपूर्ण कुटुंबाने त्याचा खास दिवस एकत्र साजरा केला आहे. श्रीराम नेने यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अरिन नेने पदवीधर झाल्याचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत आहे. या फोटोंमध्ये मुलगा अरिन नेने, पत्नी माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने इतर कॉलेज विद्यार्थ्यांसोबत दिसत आहेत. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांच्यासाठी हा क्षण अभिमानाचा आहे.

माधुरी दीक्षितचा मुलगा अरिन झाला पदवीधर:

डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अरिन नेने पदवीधर झाल्याचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'फक्त एका आठवड्यात खूप काही! प्रत्येक क्षण खूप खास होता आणि मला अरिन आणि त्याच्या सर्व वर्गमित्रांचा खूप अभिमान आहे. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एमडीने (माधुरीने) अरिनच्या पदवीदान समारंभासह तिचा वाढदिवस साजरा केला आहे. त्या दोघांसाठी यापेक्षा चांगली भेट काय असू शकते'.

नुकताच, अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपला 58 वा वाढदिवस साजरा केला आहे. यादरम्यान, डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर कुटुंबाचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र पोज देत आहे. तसेच, माधुरी दीक्षित यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


सम्बन्धित सामग्री