Monday, September 01, 2025 05:49:11 PM

31 वर्षांनी लहान असलेल्या रश्मिकासोबतच्या रोमाँटिक सीन्सवरून सलमान खान ट्रोल; ट्रोलर्सला काय म्हणाला?

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

31 वर्षांनी लहान असलेल्या रश्मिकासोबतच्या  रोमाँटिक सीन्सवरून सलमान खान ट्रोल ट्रोलर्सला काय म्हणाला

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच भाईजानच्या आगामी 'सिकंदर' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. रविवारी ट्रेलर लाँच सोहळ्यात चित्रपटाचे कलाकार आणि निर्माते उपस्थित होते. ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. मात्र या ट्रेलर लाँच कार्यक्रमात सलमानने ट्रोलिंगबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. 

सिकंदर या चित्रपटात सलमान खानने त्याच्यापेक्षा 31 वर्षांनी लहान असलेल्या रश्मिका मंदानासोबत काम केले आहे. सिकंदर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सलमान आणि रश्मिकाचे काही रोमँटिक क्षण चित्रित करण्यात आले आहेत. त्याच्यापेक्षा वयाने खूपच लहान असलेल्या अभिनेत्रीशी रोमँटिक सीन्स केल्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यावर सलमानने भाष्य केले आहे. 

हेही वाचा : 'या' देशात सापडल्या सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणी

सलमान आमि रश्मिकाच्या जोडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित


सिकंदर चित्रपटाबद्दल बरीच चर्चा होत आहे. सिकंदरचा चित्रपट आणि गाणी रिलीज झाल्यानंतर सलमान आणि रश्मिकाच्या जोडीवर टीका करण्यास सुरूवात झाली. रश्मिका सलमानपेक्षा 31 वर्षांनी लहान असल्याने ही टीका होत आहे. यावर सलमान म्हणाला,  आजकाल समाज माध्यमांमध्ये लोक कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी नक्कीच कोणाच्या तरी मागे लागतात. आता चित्रपटाबद्दल ते नायिका माझ्यापेक्षा 31 वर्षांनी लहान आहे, असे म्हणत आहेत. 


जेव्हा अभिनेत्राला काही अडचण नसते. तिच्या वडिलांना काही अडचण नसते. तर मग इतर लोकांना का अडचण असते?  उद्या, जेव्हा ती लग्न करण्याचा निर्णय घेईल, तिला मुले होतील आणि एक मोठी स्टार बनेल, तरीही ती चित्रपटांमध्ये काम करेल, यामध्ये समस्या काय आहे मला समजत नाही असे सुपरस्टार सलमान खान याने म्हटले आहे. 


सम्बन्धित सामग्री