Sikandar Box Office Collection Day १० : फ्लॉप ठरला ‘सिकंदर’; १० दिवसातही बजेटची भरपाई नाही
Sikandar Box Office Collection Day १० : ए.आर. मुरुगदॉस दिग्दर्शित आणि सलमान खान अभिनीत सिकंदर हा चित्रपट ३० मार्च रोजी ईदनिमित्त प्रदर्शित झाला होता. परंतु सलमानच्या स्टारडमवर जितक्या अपेक्षा होत्या त्या फोल ठरल्या आहेत. सिकंदरने सुरुवातीपासूनच बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कामगिरी केलेली नाही. रिलीजनंतर चौथ्या दिवसापासूनच या चित्रपटाची कमाई सिंगल डिजिटमध्ये आली होती.
सिकंदरने दहाव्या दिवशी किती कमाई केली?
सिकंदर चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ९०.२५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर सहाव्या दिवशी ३.५ कोटी रूपयांचा गल्ला केला. सातव्या दिवशी यात किंचित वाढ झाली. सातव्या दिवशी सिकंदरने ४ कोटी रूपये कमावले. आठव्या दिवशी देखील कमाईत वाढ झाली आणि आठव्या दिवशी ४.७५ कोटीचा गल्ला जमला. नवव्या दिवशी मात्र कमाईत घसरण झाली. नवव्या दिवशी सिकंदरला १.७५ कोटी रूपये कमावता आले. दहाव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी केवळ १.३५ कोटी रुपयांची कमाई झाली. त्यामुळे एकूण १० दिवसांत सिकंदरने १०५.६० कोटींचा गल्ला जमवला आहे.
हेही वाचा - Apoorva Mukhija Death Threat: इंडियाज गॉट लेटेंट वादानंतर अपूर्व मखीजाला जीवे मारण्याच्या धमक्या
२०० कोटींचं बजेट, पण कमाई अर्ध्यावरच
सिकंदर अॅक्शन थ्रिलरचा एकूण बजेट २०० कोटी रुपये इतका होता. पण सध्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरिल स्थिती पाहता २०० कोटींचा आकडा गाठणं अशक्य वाटतंय. प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही चित्रपटाला फारसं सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. कथा, पटकथा आणि अॅक्शन दृश्यांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे.
हेही वाचा - Kunal Kamra Controvercy: कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या; BookMyShow ने नावासह हटवला विनोदी कलाकाराचा कंटेंट
सिकंदर सलमानसाठी झटका
ईदला सलमान खानचा चित्रपट येतो म्हणजे हिट ठरण्याची अपेक्षा असते. पण सिकंदर फ्लॉप ठरणं सलमानसाठी एक मोठा झटका ठरला आहे. किसी का भाई किसी की जाननंतर सलमानच्या फॅन्सना यंदाच्या ईदला मोठी आशा होती. पण ती पूर्ण होऊ शकली नाही.