नेटफ्लिक्स (Netflix) वर अनेक वेब सिरीज पाहायला मिळत आहे. त्यापैकीच एक वेब सिरीज जी प्रेक्षकांना आवडली आहे आणि ती म्हणजे नेटफ्लिक्स (Netflix) वरील स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things). स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) मध्ये काम करणाऱ्या कलाकारांमुळे, त्याच्या उत्कृष्ट आणि रहस्य कथानकामुळे, 80 च्या दशकाची नॉस्टॅल्जिया असल्यामुळे, विज्ञान-काल्पनिक (Sci-Fi) आणि हॉरर (Horror) यांच्या उत्तम मिश्रणामुळे आणि बऱ्याच कारणांमुळे ही वेब सिरीज लोकप्रिय ठरली आहे. आता स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) च्या चाहत्यांना खुशखबर मिळणार आहे. लवकरच स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) चा सीझन 5 भारतात रिलीज होणार आहे. चला तर जाणून घेऊया स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) चा सीझन 5 कधी रिलीज होणार आहे.
स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) चा सीझन 5 'या' दिवशी होणार रिलीज:
स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) चा सीझन 5 लवकरच 2025 मध्ये येणार असून, ही वेब सिरीज नेटफ्लिक्स (Netflix) वर रिलीज होईल. सध्या स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) चा सीझन 5 ची अधिकृत रिलीज तारीख अद्याप जाहीर झाली नाही. मात्र, सूत्रानुसार, स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) सीझन 5 चे पहिले सहा एपिसोड 10 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित होतील आणि त्यानंतर शेवटचे दोन एपिसोड 27 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित होतील.
सीझन 5 पासून कोणती अपेक्षा करावी?
डफर ब्रदर्सने एका सस्पेन्सफुल आणि भावनिक असलेला स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) च्या सीझन 5 हाय-स्टेक ड्रामा आणि आश्चर्यचकित खुलाशांनी भरलेला आहे. कदाचित, स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) च्या सीझन 5 मध्ये तुम्हाला हॉकिन्ससोबतचे त्याचे नाते एक्सप्लोर करायला मिळेल. भयपट, नॉस्टॅल्जिया आणि भावनिक क्षणांच्या ट्रेडमार्क मिश्रणासह, स्ट्रेंजर थिंग्ज सीझन 5 हा नेटफ्लिक्सचा सर्वात प्रिय शो असेल.
हेही वाचा: Shreya Ghoshal Net Worth: श्रेया घोषाल आहे 'इतक्या' कोटींची मालकिन! एका गाण्यासाठी किती पैसे घेते? जाणून घ्या
सीझन 5 मध्ये 'हे' कलाकार साकारतील महत्वाच्या भूमिकेत:
स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) चा सीझन 5 मध्ये इलेव्हनच्या भूमिकेत मिली बॉबी ब्राउन, माईकच्या भूमिकेत फिन वोल्फहार्ड, विल बायर्सच्या भूमिकेत नोहा श्नाप, मॅक्स म्हणून सॅडी सिंक, जिम हॉपरच्या भूमिकेत डेव्हिड हार्बर आणि नतालिया डायर एकट्या नॅन्सी या ओळखीच्या चेहऱ्यांसह काही मनोरंजक आणि नवीन पात्रे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.