तमन्ना भाटिया-विजय वर्मा यांचे ब्रेकअप? इन्स्टावरिल फोटो केले डिलिट
बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. पण, अद्याप दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, तमन्ना आणि विजय यांनी एक आठवडाभर आधीच वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पण दोघांमध्ये कोणतीही कटुता नाही. त्या सूत्राने सांगितलं की, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा कपल म्हणून आता एकत्र नाहीत. पण त्यांनी चांगले मित्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.
तमन्ना-विजयने इन्स्टावरिल फोटो हटवले
विजय आणि तमन्ना यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक दुसऱ्यांचे फोटो हटवले आहेत. त्यांनी फक्त प्रमोशनचे व्हिडिओ मात्र ठेवले आहेत. तमन्ना आणि विजय वर्मा यांनी फोटो का हटवले याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण दोघांचा ब्रेकअप झाल्यामुळंच त्यांनी फोटो हटवलं असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - रणवीर अल्लाहाबादियाला मोठा दिलासा – सर्वोच्च न्यायालयाने शो सुरु करण्याची परवानगी दिली!
असे जुळले तपन्ना-विजयचे प्रेमबंध
तमन्ना आणि विजय यांच्यातील प्रेमसंबंध 2023 मध्ये चर्चेत आले. नवीन वर्षाच्या सुरुवातीला दोघे सुट्टीसाठी गेले होते आणि त्यावेळी त्यांचे एकामेकांसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. त्या फोटोंमध्ये ते एकमेकांना किस करताना दिसले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली.
यानंतर ‘लस्ट स्टोरीज 2’ या चित्रपटात ते दोघे एकत्र झळकले. याच चित्रपटादरम्यान त्यांनी आपलं प्रेमसंबंध असल्याचं अधिकृतरित्या जाहीर केलं. त्यानंतर अनेक मुलाखतींमध्ये दोघांनी एकमेकांविषयी सांगितलं होतं. त्यामुळं त्यांचं प्रेमसंबंध जगजाहिर झालं होतं.
हेही वाचा - Shraddha Kapoor Birthday: अभिनेत्री श्रद्धा कपूरबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहे?
आता तमन्ना आणि विजयने एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी त्यांच्या नात्यात कटुता नाही. ते चांगले मित्र म्हणून सोबत राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यांच्या चाहत्यांना या ब्रेकअपमुळे धक्का बसला असला आहे.