Monday, September 01, 2025 07:41:16 PM

Rohit Sharma: BCCI चा डाव फसला? रोहित शर्मा आणि 'या' युवा स्टार्सने ब्रॉन्को टेस्टमध्ये मारली बाजी

भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने टीम इंडियासाठी फक्त यो-यो टेस्टच नव्हे तर ब्रॉन्को टेस्ट देखील अनिवार्य केली आहे.

rohit sharma bcci चा डाव फसला रोहित शर्मा आणि या युवा स्टार्सने ब्रॉन्को टेस्टमध्ये मारली बाजी

Rohit Sharma: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने टीम इंडियासाठी फक्त यो-यो टेस्टच नव्हे तर ब्रॉन्को टेस्ट देखील अनिवार्य केली आहे. हि टेस्ट रग्बी खेळातून आणली गेली असून खेळाडूंची सहनशक्ती, स्टॅमिना आणि जलद रिकव्हरी क्षमता तपासण्यासाठी वापरली जाते.

अलीकडेच, भारतीय संघाचा अनुभवी कर्णधार रोहित शर्माने वयाच्या 38व्या वर्षी हि आव्हानात्मक ब्रोंको टेस्ट पास करून सर्वांना धक्का दिला. रोहितने केवळ ब्रोंको टेस्टच नाही तर यो-यो टेस्ट सुद्धा यशस्वीरित्या पार केली. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलन्समध्ये आयोजित फिटनेस कॅम्पमध्ये त्याने हा गौरव मिळवला.
 

हेही वाचा: Women's World Cup 2025: महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी बक्षीस रकमेची घोषणा; 2022 च्या तुलनेत बक्षीस रकमेत चार पट वाढ

रोहितसोबतच काही इतर युवा आणि अनुभवी क्रिकेटपटूंनी देखील या कठीण टेस्टमध्ये आपली फिटनेस सिद्ध केली. जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, यशस्वी जयसवाल आणि प्रसिद्ध कृष्णा या स्टार्सने देखील ब्रोंको आणि यो-यो टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केली.

ब्रोंको टेस्ट ही फक्त शारीरिक क्षमता तपासणारी परीक्षा नाही, तर मनोबल, धैर्य आणि मानसिक सहनशक्ती सुद्धा तपासते. क्रिकेटच्या आधुनिक शैलीत खेळाडूंना सतत जास्त खेळावे लागते आणि त्यांच्या शरीरावर मोठा ताण येतो. अशा परिस्थितीत ब्रोंको टेस्ट ही त्यांच्या फिटनेसची खरी कसोटी ठरते.

ब्रोंको टेस्टचे स्वरूप अगदी सोपे दिसते, पण शारीरिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक आहे. या टेस्टमध्ये चार कोन 0 मीटर, 20 मीटर, 40 मीटर आणि 60 मीटर अंतरावर ठेवले जातात. प्रत्येक सेटमध्ये खेळाडूंना 20 मीटरच्या अंतरावर जाऊन परत यावे लागते, त्यानंतर 40 मीटर आणि शेवटी 60 मीटर अंतरावर जाऊन परत यावे लागते. प्रत्येक सेटमध्ये एकूण 240 मीटरची शटल दौड होते आणि एकूण पाच सेट पूर्ण करावे लागतात. परिणामी, खेळाडू एकूण 1,200 मीटर शटल दौड करतो आणि या दरम्यान विश्रांतीसाठी कोणताही ब्रेक मिळत नाही.

हेही वाचा: Neeraj Chopra : वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे नेतृत्व नीरज चोप्राकडे

या कठीण टेस्टमध्ये यशस्वी होणे म्हणजे खेळाडूची एलीट फिटनेस, स्टॅमिना आणि मानसिक धैर्य यांची उत्तम झलक. रोहित शर्मा यासारख्या अनुभवी खेळाडूने ब्रोंको टेस्ट पास करून दाखवल्याने सर्व युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे. याशिवाय, बुमराह, सिराज आणि शुभमन गिलसारख्या युवा स्टार्सने सुद्धा आपली फिटनेस क्षमता सिद्ध केली आहे.

बीसीसीआयने आणलेली ब्रोंको टेस्ट ही क्रिकेटरच्या आधुनिक फिटनेसचे प्रमाण आहे. रोहित शर्मा आणि इतर स्टार्सने ही आव्हानात्मक टेस्ट पास करून भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसची नवी उंची गाठली आहे.


सम्बन्धित सामग्री