Indian Cricketers New Bronco Test : भारतीय क्रिकेटपटूंचा फिटनेस आणि एरोबिक सुधारण्यासाठी, बीसीसीआयने रग्बी-शैलीची ब्रोनको टेस्ट सुरू केली आहे. या फिटनेस टेस्टमध्ये 20 मीटर, 40 मीटर आणि 60 मीटरच्या शटल रनचा समावेश आहे. भारतीय संघाचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक एड्रियन ले रॉक्स (Adrian Le Rouxe) यांनी ही सूचना केली, असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताचे हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांचेही हेच मत आहे.
जलदगती गोलंदाजांनी जिम ऐवजी शक्य तितके धावावे, असे मत एड्रियन ले रॉक्स यांचे आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचेही असेच मत आहे. इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर यावर जास्त भर दिला जात आहे. तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी दरम्यान, काही जलद गोलंदाजांची फिटनेस पातळी चांगली नसल्याचे दिसून आले. प्रत्येक सामन्यात फक्त वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज खेळला. याआधी माजी कोच रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात यो-यो टेस्ट (YO -YO Test) अनिवार्य करण्यात आली होती, जी खेळाडूंच्या फिटनेससाठी खूप उपयुक्त ठरली.
हेही वाचा - Asia Cup India Vs Pakistan : अखेर ठरलं ! भारत विरुध्द पाकिस्तान सामना खेळण्याबाबत केंद्राचा मोठा निर्णय
काही अव्वल खेळाडूंनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय - BCCI) बेंगळुरू येथील हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये ब्रोनको चाचणी आधीच दिली आहे. बीसीसीआयने आधीच क्रिकेटपटूंसाठी फिटनेस चाचण्या म्हणून यो-यो चाचणी आणि 2 किमी टाइम ट्रायल लागू केले आहे.
ब्रोनको टेस्ट म्हणजे काय?
खेळाडू मैदानावर किंवा ट्रॅकवर एका विशिष्ट ठिकाणी उभा राहतो. मैदानावर 20 मीटर, 40 मीटर आणि 60 मीटर अंतरावर मार्कर (खूण) ठेवलेले असतात. चाचणी सुरू झाल्यावर खेळाडूला खालील क्रमाने धावावे लागते. तो 20 मीटरच्या मार्करपर्यंत धावतो आणि परत सुरुवातीच्या ठिकाणी येतो. (एकूण 40 मीटर) त्यानंतर तो 40 मीटरच्या मार्करपर्यंत धावतो आणि परत सुरुवातीच्या ठिकाणी येतो. (एकूण 80 मीटर) शेवटी, तो 60 मीटरच्या मार्करपर्यंत धावतो आणि परत सुरुवातीच्या ठिकाणी येतो. (एकूण 120 मीटर) वरील तीन शटल रन मिळून एक 'सेट' पूर्ण होतो. प्रत्येक सेटमध्ये खेळाडू एकूण 240 मीटर धावतो. खेळाडूला हे सलग पाच सेट पूर्ण करावे लागतात. म्हणजेच, त्याला न थांबता एकूण 1200 मीटर (1.2 किमी) धावावे लागते.
एड्रियन ले रॉक्स जूनमध्ये भारतीय संघात स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच म्हणून दाखल झाले. त्यांनी जानेवारी 2002 ते मे 2003 पर्यंत भारतीय संघासोबत याच पदावर काम केले आहे. याशिवाय, त्यांनी साउथ आफ्रिका आणि आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जसोबत देखील काम केले आहे.
ब्रोंको चाचणीची आवश्यकता का होती?
बीसीसीआय एका सूत्राने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, 'सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ब्रोंको चाचणी सुरू करण्यात आली आहे. भारतातील काही करारबद्ध खेळाडूंनी बंगळुरूला येऊन ही चाचणी दिली आहे. भारतीय क्रिकेटपटू, खास करून वेगवान गोलंदाज जिममध्ये जास्त वेळ घालवत असताना पुरेसे धावत नाहीत. खेळाडूंना सांगण्यात आलं आहे की त्यांना अधिक धावावे लागेल.
हेही वाचा - Asia Cup 2025 India vs Pakistan : 'ठामपणे सांगतो, भारत विरूद्ध पाकिस्तान सामना रद्द होणार', माजी क्रिकेटपटूनं व्यक्त केला विश्वास