कॉमेडियन समय रैना सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोरादम्यान झालेल्या वादानंतर वत्याचावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही काळ गायब राहिलेल्या समयने अखेर स्टँडअप शोसह पुनरागमन केले आणि त्याच्या पहिल्याच परफॉर्मन्समध्ये त्याची भावनिक स्थिती स्पष्टपणे जाणवली.
एडमंटन, कॅनडा येथे झालेल्या स्टँडअप शोमध्ये समय रैना पुन्हा रंगमंचावर उभा राहिला. शोमध्ये सहभागी झालेल्या वादानंतर शुभम दत्ता नावाच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर त्याचा अनुभ शेअर केला. त्याच्या म्हणण्यानुसार, समय स्टेजवर आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता, त्याच्या डोळ्यार्ट अश्रू होते, पण त्याने स्वतःला सावरत सीतेवर उभं राहण्याची हिंमत दाखवली.
हेही वाचा : सोन्याच्या दरात मोठी घसरण! विक्रमी वाढीनंतर किंमती घसरल्या, जाणून घ्या आजचा नवा दर
प्रेक्षकांनी समयच्या नावाचा जयघोष सुरू केला आणि काही क्षण त्याने स्वतःला शांत करत, हळूहळू परफॉर्मन्सला सुरुवात केली. शो दरम्यान, एका प्रेक्षकाने रणवीर अलाहाबादिया आणि त्या वादाचा उल्लेख करत समयवर हलक्या फुलक्या शब्दांत विनोद केला. त्यावर आपल्या नेहमीच्या शैलीत प्रत्युत्तर देत समय म्हणाला –“इस शो पर बहुत मौके आएंगे, जहां आपको लग सकता है कि मैं बहुत मजेदार कुछ बोल सकता हूं, पर तब बीयरबिसेप्स को याद कर लेना भाई.”
समयने या शोमध्ये दोन तास प्रेक्षकांना मनमुराद हसवलं. त्याने स्वतःच्या आयुष्यात सुरू असलेल्या संघर्षावरही भाष्य केलं, मात्र त्याचा मूड कायम हलका ठेवण्याचा प्रयत्न केला. शेवटी, शो संपताना त्याने एक दमदार वाक्य उच्चारलं –“शायद समय खराब चल रहा है मेरा, पर याद रखना दोस्तों, मैं समय हूँ!” समयच्या या शब्दांनी प्रेक्षक भारावले.