Thursday, August 21, 2025 03:36:21 AM

पत्नीमुळे तरूणाने उचलेले मोठे पाऊल...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पत्नीमुळे तरूणाने उचलेले मोठे पाऊल

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नी नांदण्यास येत नाही म्हणून तरूणाने आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पत्नी नांदण्यास येत नाही म्हणून तरुणाने कायगाव येथील गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. पत्नी नांदायला येत नसल्याने निराश झालेल्या कामगार युवकाने छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथील गोदावरी नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. सुशील मुकिंदा तायडे असे मृत युवकाचे नाव आहे. हा युवक वाळूज एमआयडीसी येथे एका कंपनीत कामाला होता. वर्षभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता. तो पत्नीसह वाळूज एमआयडीसी येथे राहत होता. मात्र लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पत्नी माहेरी गेली. त्यामुळे हल्ली तो वडगाव कोल्हाटी येथे बहिणीकडे राहत होता.

 

सुशील हा बुधवारपासून बेपत्ता होता. बेपत्ता असल्याचे कळताच नातेवाईकांनी शोधाशोध करण्यास शोधूनही सापडला नसल्याने नातेवाईकांनी वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती. जुने कायगाव येथील गोदावरी नदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळला. पोलिसांनी नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर हा मृतदेह सुशील यांचा असल्याचे त्यांच्या नातेवाईकांना म्हटले आहे.

एखाद्या छोट्या कारणावरून स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जीव संपवणे वाईट आहे. अशा पद्धतीने स्वत:चा जीव देऊन कुठलीही अडचण सुटत नाही. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते. तसेच प्रत्येक अडचणीला सोल्युशन असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवरून आत्महत्या करणे टाळा.

 

 

 

 


सम्बन्धित सामग्री