Wednesday, August 20, 2025 10:26:09 PM

Viral Video: एमएस धोनी बाद होताच तरुणीची रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल

धोनी बाद झाल्यानंतर स्टेडियममध्ये चेन्नईच्या समर्थकांमध्ये प्रचंड निराशा पसरली. मात्र, विशेष लक्ष वेधून घेतले ते एका तरुणीच्या संतप्त प्रतिक्रियाने. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला

viral video  एमएस धोनी बाद होताच तरुणीची रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई: आयपीएल 2025 च्या रोमांचक हंगामात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) दोन पराभवानंतर दमदार पुनरागमन करत चेन्नई सुपर किंग्जवर (Chennai Super Kings) सहा धावांनी विजय मिळवला. चेन्नईसाठी हा सलग दुसरा पराभव होता. या थरारक सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठा कायम राहिली होती. मात्र, या सामन्यातील एका क्षणाने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवली आहे. 

राजस्थानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 बाद 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईला विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य होते. सामना शेवटच्या षटकात आला तेव्हा महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) क्रीजवर होते, आणि चेन्नईला विजयासाठी 20 धावांची गरज होती. चाहत्यांच्या आशा अजूनही धोनीवर टिकून होत्या. नवख्या कर्णधार रियान परागने (Riyan Parag) राजस्थानसाठी शेवटचे षटक संदीप शर्माकडे (Sandeep Sharma) सोपवले. पहिलाच चेंडू वाईड गेला, ज्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर उमटली. मात्र दुसऱ्याच चेंडूवर संदीप शर्माने धोनीला मोठा फटका खेळण्यास भाग पाडले आणि शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) तो झेल टिपला. धोनी बाद झाला आणि चेन्नईच्या चाहत्यांचा हिरमोड झाला.

हेही वाचा: `इदं न मम’ माहितीपटाचा लोकार्पण सोहळा साजरा:उमाकांत मिटकर यांच्या समाजनिष्ठ जीवनप्रवासाचे प्रेरक चित्रण

तरुणीच्या रागाने सोशल मीडिया गाजला
धोनी बाद झाल्यानंतर स्टेडियममध्ये चेन्नईच्या समर्थकांमध्ये प्रचंड निराशा पसरली. मात्र, विशेष लक्ष वेधून घेतले ते एका तरुणीच्या संतप्त प्रतिक्रियाने. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. धोनी आउट होताच ती चाहती संतापलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी झळकत होती, ती रागाने लाल झाली होती, आणि तिची हताश प्रतिक्रिया पाहून अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

हा व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने शेअर केला जात आहे. काही चाहते तिच्या भावना समजून घेत आहेत, तर काहींनी हे मनोरंजक असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर काही मीम्स आणि ट्रोल्सदेखील व्हायरल होत आहेत. धोनीवर असलेले चाहते प्रेम आणि त्याची मैदानातील लोकप्रियता यामुळे अशा प्रतिक्रिया सहाजिक असल्याचे अनेकांनी म्हंटले आहे. 

'>http://


सम्बन्धित सामग्री






Live TV