Sunday, August 31, 2025 04:37:44 AM

स्वप्नील जोशीच्या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न

काही दिवसांपूर्वी अभिनेता, निर्माता स्वप्नील जोशीच्या बहुचर्चित सुशीला सुजीत चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या ट्रेलरने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.

स्वप्नील जोशीच्या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेता, निर्माता स्वप्नील जोशीच्या बहुचर्चित सुशीला सुजीत चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या ट्रेलरने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आणि याला कारण देखील तितकच खास आहे. 

स्वप्नील या चित्रपटाचा मुख्य नट असला तरी या चित्रपटात तो दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. स्वप्नील अभिनेता आणि निर्माता या दोन मुख्य भूमिका साकारणार असून हे बघायला जेवढं सोप्प दिसतंय तितकं नक्कीच नाही. सुशीला सुजीतमध्ये या दोन महत्त्वपूर्ण भूमिका तो साकारणार असताना सगळ्या गोष्टी नीट निभावल्या जातात ना याकडे त्याच लक्ष देखील तितकच होतं.

हेही वाचा : ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन

सुशीला सुजीत चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाला, चित्रपटात दुहेरी भूमिका साकारत असताना एकीकडे निर्माता आणि एकीकडे मुख्य अभिनेता म्हणून भूमिका साकारणं ही तारेवरची कसरतच होती असं म्हणायला हरकत नाही. या चित्रपटात दोन्ही भूमिका आव्हानात्मक आणि ताकदीने साकारणं माझ्या सगळ्या  मित्र मंडळींमुळे शक्य झालं. सुशीला सुजीतमध्ये माझ्या आवडत्या लोकासासोबत काम करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आणि आता आमचा चित्रपट तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रसाद, मंजिरी, सोनाली आणि अमृता ही सगळीच खूप जवळची मित्र मंडळी आहेत. या सगळ्यांसोबत हा चित्रपट घडला याचा आनंद असल्याचे स्वपनील जोशीने सांगितले. 

सुशीला सुजीतने ट्रेलर लाँच होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पण चित्रपटाच्या निमित्ताने त्याने पहिल्यांदा सोनाली कुलकर्णीसोबत ऑन स्क्रीन काम केलं आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोहळा आगळ्या वेगळ्या रूपात झाला आणि त्याचं कारण म्हणजे चित्रपटाचा ट्रेलर हा कलाकारांच्या हातून न होता, चक्क चित्रपटाच्या स्पॉट बॉयकडून करण्यात आला. कलाकारांच्या आयुष्यात किंवा फिल्मच्या सेटवर जो माणूस अगदी अहोरात्र काम करतो. तो म्हणजे स्पॉट बॉय होय. हे स्पॉट दादा खरंच कमालीच काम करत असतात आणि म्हणून चित्रपटाच्या ट्रेलर लाँच निमित्ताने त्यांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं. सुशीला सुजीतमध्ये स्वप्नील सुजीतची भूमिका साकारणार असून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी स्वप्नील सज्ज आहे. बेडरूममध्ये अडकलेले सुशीला सुजीत आता कसे बाहेर पडणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. 

यंदाचं वर्ष हे स्वप्नीलसाठी वैविध्यपूर्ण चित्रपटासाठी खास तर आहे पण तो बहुभाषिक चित्रपटात देखील झळकणार आहे. सुशीला सुजीत ही स्वप्नीलच्या आयुष्यातली खास फिल्म तर आहे पण त्याने त्याच्या आवडत्या मित्र मंडळींच्या सोबतीने यात काम केल्याचा आनंद देखील तितकाच आहे.


सम्बन्धित सामग्री