Rajesh Keshav: प्रसिद्ध अभिनेते आणि अँकर राजेश केशव यांची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी रात्री कोची येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान ते अचानक स्टेजवर कोसळले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची पुष्टी केली. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली असून ते सध्या आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत.
हेही वाचा - Inspector Zende Trailer: OTT वर कॉमेडीचा तडका! 10 दिवसांनी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार मनोज बाजपेयीचा ‘इन्स्पेक्टर झेंडे’ चित्रपट
रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हृदयविकाराच्या झटक्याचा परिणाम त्यांच्या मेंदूवरही झालेला आहे. पुढील 72२ तास अत्यंत महत्त्वाचे असून त्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबद्दल ठोस माहिती देणे शक्य होईल, असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. या घटनेने त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी राजेश केशव यांच्यासाठी प्रार्थना करताना त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा - CM Yogi Biopic Ajey: योगी आदित्यनाथ यांचे जीवन रुपेरी पडद्यावर झळकणार! 'अजय' चित्रपटाला मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील
दरम्यान, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक प्रताप जयलक्ष्मी यांनी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'आमचा प्रिय राजेश, जो एकेकाळी प्रत्येक रंगमंचावर जीवनाचा प्रकाश पसरवत होता, तो आता शांतपणे पडून आहे, फक्त मशीनच्या मदतीने श्वास घेत आहे. पण आम्हाला खात्री आहे की तो पुन्हा उभा राहील, कारण राजेशसारखा माणूस शोच्या मध्यभागी कधीच जाऊ शकत नाही. आता त्याला फक्त औषधांचीच नाही, तर आपल्या प्रेमाची आणि प्रार्थनांचीही गरज आहे. जर आपण त्याच्यासाठी प्रार्थना केली तर तो नक्कीच पुन्हा उठेल.'