Thursday, September 18, 2025 09:22:52 AM

PM Narendra Modi Biopic: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित ‘मा वंदे’ चित्रपटात उन्नी मुकुंदन

हिट ठरलेल्या ‘मार्को’ चित्रपटानंतर मल्याळम अभिनेता उन्नी मुकुंदन लवकरच एका विशेष भूमिकेत दिसणार आहे.

pm narendra modi biopic पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित ‘मा वंदे’ चित्रपटात उन्नी मुकुंदन

PM Narendra Modi Biopic: हिट ठरलेल्या ‘मार्को’ चित्रपटानंतर मल्याळम अभिनेता उन्नी मुकुंदन लवकरच एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मा वंदे’ या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन क्रांती कुमार सी. एच. यांनी केले आहे.

या चित्रपटात नरेंद्र मोदींच्या बालपणापासून त्यांच्या देशाच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंतच्या प्रवासाचे चित्रण होईल. विशेष म्हणजे, कथानकात राजकीय टप्प्यांसोबतच त्यांच्या वैयक्तिक संघर्षांना आणि आई हीराबेन मोदी यांच्याशी असलेल्या घट्ट नातेसंबंधालाही महत्त्वाचे स्थान दिले जाणार आहे.

हेही वाचा:Robert Redford Dies: हॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रॉबर्ट रेडफोर्ड यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चित्रपटाचा पहिले पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आले. त्यात मोदींचा हात कागदावर लिहिताना दाखवला असून, त्यांच्या जीवनप्रवासाची कहाणी पडद्यावर आणण्याचा प्रयत्न यातून अधोरेखित केला आहे. या भूमिकेबद्दल उन्नी मुकुंदन म्हणतो की, मोदींच्या व्यक्तिमत्त्वाने त्यांना बालपणापासूनच प्रेरित केले आहे. अहमदाबादमध्ये वाढताना त्यांनी मोदींना प्रथम मुख्यमंत्री म्हणून पाहिले, तर 2023 मध्ये त्यांची झालेली प्रत्यक्ष भेट आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरली.

त्याने पुढे सांगितले की, मोदींनी दिलेला “झुकवाणू नाही” हा संदेश आजही त्याला संघर्षाच्या काळात आधार देतो. अभिनेता म्हणून ही भूमिका साकारणे मोठे आव्हान असूनही ती त्याला तितकीच प्रेरणादायी वाटत आहे.

‘मा वंदे’ हा चित्रपट भारतातील सर्व प्रमुख भाषांसह इंग्रजीत देखील प्रदर्शित होणार आहे. मोठ्या बजेटमध्ये आणि आधुनिक तांत्रिक साधनांच्या साहाय्याने बनणारा हा प्रकल्प लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.


सम्बन्धित सामग्री