सध्या साऊथ फिल्म इंडस्ट्री फार चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे अलिकडेच रीलिज झालेल्या केजीएफ चॅप्टर 1 आणि 2, त्यानंतर पुष्पा: द राईज आणि पुष्पा 2: द रूल, आरआरआर यांनी मिळवलेलं घवघवीत यश. नुकताच 30 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाने एक नवीन पातळीवर यश मिळवलं. हा चित्रपट संस्कृती, धर्म आणि परंपरा या साऱ्या विषयांना दर्शवला आहे. ‘कांतारा’ या चित्रपटांत दाखवलेल्या पंजुर्ली देवता , गुलीगा देवा आणि भुता कोला यांच्याबद्दल दाखवलेला इतिहास पाहून अनेकांना यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दिसत आहेत. चला तर आपण जाणून घेऊया काय आहे यामागची कथा.
कोण आहे पंजुर्ली देवता?
पंजुर्ली देवता दक्षिण भारतात पूजला जाणारा देवता आहे. त्यांचा चेहरा डुकराचा आहे. कर्नाटक आणि केरळमध्ये त्यांची विशेष पूजा केली जाते. तिथल्या रहिवाशांच्या श्रद्धेनुसार, पंजुर्ली देवता जंगल आणि तिथे राहणाऱ्या लोकांचे रक्षण करतात. आपल्या कुटुंबासह जमीन आणि शेतीच्या कल्याणासाठी तेथील रहिवाशी पांजुर्ली देवतेची आराधना करतात.
हेही वाचा: शनि देवाच्या शिळेची झीज होऊ नये म्हणून निर्णय
पंजुर्ली देवता कोणत्या देवाचा अवतार आहे?
असे म्हणतात की पंजुर्ली देवता विष्णू देवांच्या दहा अवतारांपैकी तिसरा वराह अवतार मानला जातो, ज्यांचे स्वरूप डुकरासारखे आहे. त्याची दक्षिण भारतात पांजुराली देवता म्हणून पूजा केली जाते. सतयुगातील वराह या अवताराबद्दल काही पौराणिक समजुतीदेखील आहेत. वराह अवतार संबंधित माहिती आपल्याला विष्णू पुराण, स्कंद पुराण, ऋग्वेद आणि भगवद् पुराणात मिळते. पंजुर्ली ही दक्षिण भारतातील सर्वांत प्राचीन देवतांपैकी एक आहे. अशी मान्यता आहे की जेव्हा पृथ्वीवर सर्वप्रथम अन्नाची निर्मिती झाली होती, त्याच वेळी मानव सभ्यतेच्या सुरुवातीला पंजुर्ली देवता पृथ्वीवर आले.
पंजुर्ली देवतांची कथा:
पौराणिक कथेनुसार, वराह देवांचे पाच पुत्र झाले. त्यापैकी एक नवजात बाळ मागे राहून गेला. भूक आणि तहान लागल्यामुळे त्रस्त होऊन ते मृत्यूच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले. त्याच वेळी माता पार्वती प्रवासादरम्यान तिथे पोहोचली. तेव्हा माता पार्वतींनी त्या नवजात बाळाला कैलास पर्वतावर आणले. माता पार्वतींनी त्या नवजात शिशुला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणेच सांभाळायला सुरुवात केली. काही वर्षांनी त्या मुलाने राक्षसी वराहाचे रूप धारण केले. काही कालावधीनंतर त्याची दाढी बाहेर आली. त्यामुळे त्याला काळजी वाटू लागली आणि खाज सुटू नये म्हणून त्याने पृथ्वीमधील सर्व पिके नष्ट करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जगात अन्नाची कमतरता होऊ लागली.
हेही वाचा: शनिवारचे उपाय : शनिवारी करा या 5 गोष्टी, शनि महाराज होतील प्रसन्न; इच्छा होतील पूर्ण!
महादेवांचा राग अनावर झाला:
हे पाहून महादेवांनी जगाच्या हितासाठी त्या वराहला मारण्याचा विचार केला. मात्र जेव्हा माता पार्वतीला हे समजले तेव्हा त्यांनी महादेवांना त्याचे प्राण न घेण्यासाठी विनंती केली. माता पार्वतींनी केलेल्या विनंतीमुळे महादेवांनी त्याला मारले नाही परंतु त्याला कैलासातून बाहेर काढले आणि पृथ्वीवर जाण्याचा शाप दिला. आपला जीव वाचवल्यानंतर वराह पुढे आले आणि त्यांनी महादेव आणि माता पार्वतीला विनंती केली. तेव्हा महादेवांनी त्याला दैवी शक्तीच्या रूपात पृथ्वीवर जाण्याची आणि तेथील मानवांचे आणि त्यांच्या पिकांचे रक्षण करण्याचे आदेश दिले.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)