Sunday, August 31, 2025 11:26:37 AM

CM Yogi Biopic Ajey: योगी आदित्यनाथ यांचे जीवन रुपेरी पडद्यावर झळकणार! 'अजय' चित्रपटाला मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील

सीबीएफसीने 29 दृश्यांवर आक्षेप घेतला होता, त्यापैकी अनेक अत्यंत किरकोळ होते. पुनरावलोकन समितीने 8 आक्षेप काढले, पण 21 कायम ठेवले.

cm yogi biopic ajey योगी आदित्यनाथ यांचे जीवन रुपेरी पडद्यावर झळकणार अजय चित्रपटाला मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील

CM Yogi Biopic Ajey: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित 'अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' या चित्रपटाला अखेर प्रदर्शित होण्यासाठी परवानगी मिळाली आहे. यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला हिरवा कंदील दाखवण्यास नकार दिला होता, मात्र हा वाद अखेर मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्वतः चित्रपट पाहिला आणि त्यानंतर त्याच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला.

सम्राट सिनेमॅटिक प्रॉडक्शन हाऊस या चित्रपटाचे निर्माते आहेत. त्यांचा दावा आहे की, त्यांनी 5 जून रोजी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता, परंतु ठरलेल्या वेळेत सेन्सॉर बोर्डाकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिप्पट शुल्क भरून 'प्राधान्य योजने'त अर्ज केला असतानाही, निश्चित केलेली पाहणी तारीख एक दिवस आधी रद्द करण्यात आली.

हेही वाचा - Atharva Sudame Controversy: मनोरंजन कर, अक्कल शिकवू नको; अथर्व सुदामेवर ब्राह्मण महासंघाचा घणाघात

दरम्यान, चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेता अजय मेंगी यांनी सांगितले, आम्ही मेहनतीने हा चित्रपट बनवला असून त्यात कोणतेही आक्षेपार्ह दृश्य नाही. हा चित्रपट ‘द मंक हू बिकेम चीफ मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित आहे. जर योगीजींनी समाजासाठी काम केले असेल तर त्यांच्या कार्यावर चित्रपट बनणे चुकीचे नाही. सीबीएफसीने 29 दृश्यांवर आक्षेप घेतला होता, त्यापैकी अनेक अत्यंत किरकोळ होते. पुनरावलोकन समितीने 8 आक्षेप काढले, पण 21 कायम ठेवले. एका दृश्यात फक्त 'सॉरी' हा शब्द वापरल्याबद्दल देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले. हे पूर्णपणे विसंगत होते, असेही अजय मेंगी यांनी सांगितले. 

हेही वाचा - Parineeti Chopra Pregnancy Announcement : चाहत्यांना राघव चड्ढाच्या कपिल शर्मा शोमधील 'त्या' बोलण्याची आठवण; 'IYKYK'

न्यायालयाचा निर्णय

न्यायालयाने चित्रपट पाहिल्यानंतर सीबीएफसीचा विरोध ग्राह्य धरला नाही आणि निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी दिली. त्यामुळे आता प्रेक्षकांना हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवींद्र गौतम यांनी केले असून, ते ‘महाराणी 2’ चे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. यात दिनेश लाल यादव (निरहुआ), अजय मेंगी, पवन मल्होत्रा, राजेश खट्टर, गरिमा विक्रांत सिंह आणि सरवर आहुजा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला संगीत मीत ब्रदर्स यांनी दिले असून कथा दिलीप बच्चन झा आणि प्रियांक दुबे यांनी लिहिली आहे.


सम्बन्धित सामग्री