Saturday, August 23, 2025 03:28:05 AM

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी भोलेनाथांना चूकुनही अर्पण करू नका 'या' वस्तू

हिंदू धर्मशास्त्रांनुसार, शिवपूजेमध्ये काही वस्तू अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. या वस्तू अनवधानानेही अर्पण केल्या गेल्यास शिवाचा कोप ओढवू शकतो.

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी भोलेनाथांना चूकुनही अर्पण करू नका या वस्तू
Edited Image

मुंबई: श्रावण महिन्यात भोलेनाथाची भक्तीभावाने पूजा केली जाते. दर सोमवारी शिवमंदिरात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागतात. जलाभिषेक, दुग्धाभिषेक आणि बेलपत्र अर्पण करत भोलेनाथाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक आटापिटा करत असतात. मात्र, हिंदू धर्मशास्त्रांनुसार, शिवपूजेमध्ये काही वस्तू अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. या वस्तू अनवधानानेही अर्पण केल्या गेल्यास शिवाचा कोप ओढवू शकतो. त्यामुळे कोणत्या गोष्टी भोलेनाथाला अर्पण करू नयेत याची माहिती जाणून घेणे अत्यावश्यक आहे.

केतकी फुले - 

केतकी फुलांचे शिवपूजेत अर्पण करण्यास सक्त मनाई आहे. पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेव व केतकी फुलाने मिळून शिवलिंगाच्या शेवटाचा खोटा दावा केला होता. त्यामुळे शिवाने रागाने केतकी फुलांना शाप दिला आणि ते शिवपूजेसाठी निषिद्ध ठरले.

तुळशीची पाने - 

इतर देवांच्या पूजेत महत्त्व असलेल्या तुळशीचे शिवपूजेत अर्पण करणे निषिद्ध आहे. कारण जालंधराच्या वधानंतर त्याची पत्नी तुळशीने शिवाला शाप दिला होता की ती कधीच त्याच्या पूजेत अर्पण होऊ नये. म्हणूनच शिवपूजेत तुळशीची पाने समाविष्ट केली जात नाहीत.

कुमकुम, रोली आणि सिंदूर 

कुमकुम, रोली आणि सिंदूर हे तत्त्व स्त्रीत्वाशी जोडले गेले आहे. शिवलिंग हे पुरुष तत्त्व असल्यामुळे याचा वापर पूजेत केल्यास उर्जेचे संतुलन बिघडते, असे मानले जाते. 

हेही वाचा - Kamika Ekadashi 2025: कामिका एकादशीचे व्रत कधी आणि कसे करावे, आताच योग्य वेळ लक्षात घ्या

नारळ व नारळाचे पाणी -

नारळ अर्पण करणे हे इतर देवांकरिता योग्य मानले जाते, परंतु शिवलिंगावर नारळाचे पाणी अर्पण करणे निषिद्ध आहे. त्याऐवजी जल, दूध व ऊसाचा रस यांचा अभिषेक करावा.

तुटलेले तांदूळ -

भगवान शिवाच्या पूजेत तांदूळ समाविष्ट करण्याची तरतूद आहे, कारण तांदळाला अक्षत असेही म्हणतात, म्हणजेच ते कधीही नष्ट होत नाही. म्हणूनच चुकूनही शिवलिंगावर भाताचे तुटलेले दाणे अर्पण करू नये. यामुळे भगवान शंकराचा कोप होऊ शकतो.

हेही वाचा - Shravan 2025: यंदाच्या श्रावणात 'या' 5 राशींवर असणार महादेवाची विशेष कृपा; जाणून घ्या

श्रावण सोमवार हे भोलेनाथाला प्रसन्न करण्याचे खास दिवस आहेत. त्यामुळे त्याच्या पूजेत काय अर्पण करावे आणि काय टाळावे हे जाणून पूजेची शुद्धता राखणे अत्यावश्यक आहे. 

Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.  
 


सम्बन्धित सामग्री