Sunday, August 31, 2025 10:50:01 AM

D-Mart मध्ये चोरटे 'या' वस्तू मोठ्या प्रमाणात लांबवतात! CCTV कॅमेरे आणि कर्मचारी असताना कशी बरं होते चोरी?

डी-मार्ट हे भारतातील सर्वात लोकप्रिय दुकान बनले आहे. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, डी मार्टमध्ये काही वस्तूंची चोरीही होते. इतके सीसीटीव्ही कॅमेरे आणि कर्मचारी असताना कशी बरं ही चोरी होत असेल?

d-mart मध्ये चोरटे या वस्तू मोठ्या प्रमाणात लांबवतात cctv कॅमेरे आणि कर्मचारी असताना कशी बरं होते चोरी

D-Mart Customers Stealing Things in the Store : D-Mart  हे भारतातील सर्वात लोकप्रिय दुकान आहे. सर्व प्रकारच्या वस्तू अगदी स्वस्त दरात मिळतात. यामुळे डी मार्टच्या दुकानांमध्ये नेहमीच ग्राहकांची मोठी गर्दी असते. डी मार्टमध्ये किराणा सामानापासून, गृहउपयोगी वस्तू तसेच कपडे देखील मिळतात.  

डी-मार्टमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू अगदी स्वस्त दरात मिळतात. यामुळेच मध्यमवर्गीयांची इथे नेहमी गर्दी असते. कुटुंबांच्या दैनंदिन गरजांसाठी D Mart हे एक विश्वासार्ह ठिकाण बनले आहे. गरजेच्या अनेक वस्तूंवर इथे सूट मिळत आणि या वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्याने डी मार्टमध्ये नेहमीच ग्राहकांची तुफान गर्दी असते. भारतात अनेक ठिकाणी डी मार्टच्या शाखा आहेत. याच डी मार्टमध्ये मोठ्या प्रमाणात वस्तूंची चोरी देखील होते, हे तुम्हाला माहीत आहे का? डी मार्ट कोणत्या वस्तूंची चोरी होते समजल्यावर तुमच्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटेल.

हेही वाचा - Centre Extends Exemption Period for Old Vehicle: कार मालकांना मोठा दिलासा! आता 15 वर्षे जुनी वाहने आणखी 5 वर्षे रस्त्यावर धावणार

देशभरात डी मार्टचे 375 हून अधिक स्टोअर्स आहेत आणि प्रत्येक स्टोअर स्वस्त आणि आवश्यक वस्तूंनी भरलेला आहे आणि त्यावर सूटही मिळते.  भारतातील 11 राज्यांमध्ये  डी-मार्टच्या शाखा आहेत.  महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्ली यासारख्या राज्यांचा समावेश आहे. या डी मार्टमध्ये नेहमीच ग्राहकांची मोठी गर्दी असते. मात्र, या गर्दीत देखील डी मार्टमधील वस्तूंची चोरी होते. डी मार्ट मध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तू चोरीला जातात हे समजल्यावर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. 

अंडरगारमेंट्स
डी मार्टमध्ये अंडरगारर्मेंट्स देखील विक्रीसाठी ठेवले जातात. डी मार्टमध्ये अंडरगारर्मेंट्सची मोठ्या प्रमाणात चोरी होते. अनेक ग्राहक अंडरगारर्मेंट्स तसेच इतर कपडे चेंजिंगरुमध्ये ट्राय करण्याच्या बहाण्याने घेऊन जातात. किंवा वॉशरूममध्ये घेऊऩ जातात. इथं कॅमेरे नसल्यामुळे अनेक ग्राहक अंडरगारर्मेंट्स तसेच इतर लक्षात येणार नाहीत, अशा प्रकारच्या लहान वस्तू चेंजिंगरुमध्ये किंवा वॉशरूममध्ये नेऊन कपड्यांच्या आत लपवून चोरून नेतात.

चॉकलेट आणि सुटी साखर, गूळ, शेंगदाणे
डी मार्टमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या चॉकलेट, आईसक्रीम यासारख्या वस्तू ग्राहक खरेदी करण्याच्या बहाण्याने उचलतात आणि चोरी करतात. चोरी डी मार्टच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येवू नये, यासाठी ग्राहक चोरलेले  चॉकलेट, आईसक्रीम तिथेच खातात. विशेषत: लहान मुलांना मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे चॉकलेट, आईसक्रीम  तसेच इतर खाद्यपदार्थ खायला दिले जातात. डी मार्टमध्ये चॉकलेट, आईसक्रीम यासारख्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात चोरी होते. डी मार्टच्या कर्मचाऱ्यांसमोरच ही चोरी होते.

तर, डी मार्टच्या किराणा साहित्याच्या विभागात सुटे ठेवलेले साखर, गूळ, शेंगदाणे यांची चोरी होते. कारण, लोक या वस्तूंच्या आजूबाजूने जाताना त्या हाताने उचलून तोंडात टाकतात. या ठिकाणी सगळीकडे काहीही खाण्यापिण्यास परवानगी नाही, अशा पाट्या लावलेल्या असतात, तरीही या चोऱ्या होत आहेत.

नेलकटर, क्लिपसारख्या छोट्या वस्तू
नेलकटर, हेअर क्लिप अशा वस्तू लहानशा असल्याने त्या सहजपणे लपवणे शक्य असते. अशा वस्तूंचीही डीमार्टमध्ये चोरी होते.

हेही वाचा - ‘..पाकिस्तान अजूनही डंपर आहे, हे त्यांचं अपयश’, Rajnath Singh यांनी असीम मुनीर यांच्या 'त्या' विधानाची उडवली खिल्ली

डी-मार्ट स्वतःच्या इमारतींमध्ये स्टोअर्स चालवते, ज्यामुळे भाडे खर्च वाचतो आणि त्याचा फायदा थेट ग्राहकांना कमी किंमतीत मिळतो. या कारणामुळेच डी मार्टमध्ये स्वस्त दरात वस्तू मिळतात. मात्र, अशा चोरीच्या घटनांमुळे स्टोअरचे नुकसान होते.

CCTV कॅमेरे आणि सुरक्षा कर्मचारी असतानाही प्रत्येक ग्राहकावर लक्ष ठेवणे कठीण आहे. विशेषतः गर्दीच्या वेळी या चोऱ्या होतात. या चोऱ्यांमुळे डी-मार्टला दररोज 5,000 ते 10,000 रुपयांचा तोटा होतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.


सम्बन्धित सामग्री