Sunday, August 31, 2025 08:07:48 PM

'D'mart मध्ये अधिकाधिक डिस्काउंट मिळवायचाय? या 'S'mart टिप्स कामाला येतील

डी मार्टमध्ये हमखास वस्तू स्वस्त मिळतात. पण कधीकधी विंडो शॉपिंगच्या नादात नको असलेल्या वस्तूंवर खर्च होऊन त्या वस्तू घरात येऊन पडतात. यासाठी आम्ही काही स्मार्ट खरेदीच्या टिप्स देत आहोत.

dmart मध्ये अधिकाधिक डिस्काउंट मिळवायचाय या smart टिप्स कामाला येतील

Offers And Discounts In D Mart : बहुतेक मध्यमवर्गीय लोकांसाठी डी मार्ट हे विकेंडला खरेदीसाठी पसंतीचं ठिकाण ठरलं आहे. मध्यमवर्गीयांच्या या प्रतिसादामुळे डी मार्टने देशभरात चांगला जम बसवला आहे. इथे ऑफर्समध्ये अनेक वस्तू मिळतात. घरात लागणाऱ्या जवळजवळ सर्वच वस्तू इथे मिळतात. त्यामुळे हल्ली बहुतांश लोक हे आपली महिन्याभराची घरगुती वापराच्या वस्तूंची खरेदी डीमार्ट मधून करतात. काही लोक डिमार्टमध्ये जाऊन शॉपिंग करतात. तर, काही लोक येथून घरबसल्या वस्तू घरी ऑर्डर करतात. यावरून लोकांना आता घरच्या वापरातील कोणतीही वस्तू असू देत, सर्वात पहिलं नाव आठवतं ते डी मार्टचंच.

काही जण आठवड्याभरात केव्हाही फक्त थोड्या वेळासाठी घराबाहेर फिरण्यासाठीदेखील डी मार्टमध्ये येतात. कधीकधी विंडो शॉपिंगच्या नादात नको असलेल्या वस्तूंवर खर्च होऊन त्या वस्तू घरात येऊन पडतात. तर, हे सगळं टाळून अधिकाधिक फायदा मिळवण्याचा आणि अनावश्यक खरेदी टाळण्याचा पर्याय आम्ही तुम्हाला सुचवत आहोत.

डीमार्ट हे भारतातील मोठी रिटेल चेन आहे.अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड या कंपनीमार्फत डीमार्टचं संचालन केलं जातं. इथे किराणा साहित्यापासून स्वयंपाकघरात लागणाऱ्या भांड्यापर्यंत आणि स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वस्तूंपासून ते कपडे-बुटांपर्यंत सर्व काही इथे मिळते. शिवाय, इथे वर्षाचे 365 दिवस काही ना काही सेल चालू असतो. जर तुम्ही काही स्मार्ट खरेदीचे नियम पाळले, तर तुम्ही आणखी कमी खर्चात जास्त वस्तू घेऊ शकता. चला, आता डी मार्टमध्ये स्मार्ट खरेदी कशी करायची ते पाहू.

1. ऑफर्स आणि डिस्काउंट्सकडे लक्ष ठेवा
डीमार्टमध्ये वेळोवेळी विविध ऑफर्स असतात ज्यामध्ये 'बाय वन गेट वन' ही ऑफर कायम असतेच. अशावेळी तुम्हाला दोन वस्तूंची गरज नसेल तर फक्त एकच वस्तू अर्ध्या किंमतीत विकत घेऊ शकता. इथे सणानिमित्त सवलती, जास्त खरेदीवर सूट. त्यामुळे खरेदी करण्याआधी डीमार्टची वेबसाइट किंवा फिजिकल फ्लायर्स जरूर तपासा. तसेच, एक्सपायरी डेट तपासा. स्टोअरमध्ये प्रोडक्ट्सवर लावलेले डिस्काउंट टॅग बारकाईने बघा. काही ऑफर्स फक्त ठराविक कालावधीसाठी किंवा स्टॉक संपेपर्यंतच असतात.

2. थोक खरेदीवर भर द्या
तांदूळ, डाळी, तेल, साबण यांसारख्या लवकर खराब न होणाऱ्या वस्तू तुम्ही एका वेळी जास्त प्रमाणात घेऊ शकता. यामुळे, दरात मोठी बचत होते. उदाहरणार्थ, 5 किलो ऐवजी 25 किलो तांदळाची गोणच घेता येईल. यामुळं युनिट रेट कमी पडतो. पण आवश्यकता नसताना जास्त खरेदी करणं टाळा, अन्यथा वस्तू जास्त दिवस राहून खराब होऊ शकतात.

3. खरेदीपूर्वी यादी बनवा
डीमार्टमध्ये खूप आकर्षक आणि वैविध्यपूर्ण वस्तू असतात. शिवाय, त्यांची मांडणीही नजरेत भरणारी असते. त्यामुळे अनावश्यक खरेदी होण्याची शक्यता जास्त असते. हे टाळण्यासाठी आणि डी मार्टमध्ये पोहोचल्यावर गोंधळ उडू नये, यासाठी घरून निघण्याआधी एक खरेदी करण्याच्या वस्तूंची यादी तयार करा आणि फक्त त्याच वस्तू खरेदी करा. अशाने तुमचं बजेटही बिघडणार नाही आणि गरज नसलेल्या वस्तूही टाळता येतील.

4. संपूर्ण स्टोअरमध्ये फिरून पाहा
खूप जण फक्त ठराविक सेक्शनमध्येच खरेदी करतात. पण डीमार्टमध्ये प्रत्येक विभागात वेगवेगळ्या ऑफर्स असतात. त्यामुळे सगळे सेक्शन पाहा कदाचित तिकडे तुम्हाला एखादी ऑफर मिळेल. शिवाय, केवळ ऑफर आहे म्हणून खरेदी न करता आवश्यक त्याच वस्तू खरेदी करा.

5. डीमार्ट ब्रँडची उत्पादने वापरून पाहा
डीमार्टच्या स्वतःच्या ब्रँडची उत्पादने मोठ्या ब्रँड्सच्या तुलनेत स्वस्त असतात आणि त्यांची गुणवत्ता देखील चांगली असते. तेव्हा मसाले, ड्राय फ्रुटस अशा अनेक वस्तू डीमार्ट ब्रँडमध्ये घेऊन तुम्ही चांगली बचत करू शकता.

6. गर्दी कमी असलेले दिवस निवडा
शक्य असेल, तर सोमवार किंवा मंगळवारसारख्या तुलनेने शांत दिवशी खरेदी करा यामुळं तुम्ही प्रत्येक विभाग नीट पाहू शकाल आणि योग्य ऑफर्स निवडू शकाल. वीकेंडला आणि महिन्याच्या सुरुवातीला डीमार्टमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे ऑफर्स नीट बघता येत नाहीत आणि गडबडीत चुकीची खरेदी होते. 

डी मार्टमध्ये हमखास वस्तू स्वस्त मिळतात. डी मार्ट ग्राहकांना बजेटमध्ये दर्जेदार उत्पादने देण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण या खरेदीमध्ये जरा शहाणपण वापरलं, तर तुमचं बजेट जास्त वाढणार नाही. तेव्हा वरील टिप्सचा जरूर वापर करा.


सम्बन्धित सामग्री