Monday, September 01, 2025 01:04:35 PM

इराकच्या शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग; 50 जणांचा मृत्यू, पहा व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये दिसते की, आग एका मजल्यावरून संपूर्ण इमारतीत पसरली असून मॉल पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

इराकच्या शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग 50 जणांचा मृत्यू पहा व्हिडिओ
Iraq Shopping Mall Fire
Edited Image

बगदाद: इराकमधील एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. इराकच्या राज्य माध्यमांनी गुरुवारी वृत्त दिले की, त्यांच्या पूर्वेकडील कुट शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागली. यामध्ये सुमारे 50 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की आग एका मजल्यापासून सर्व मजल्यांवर पसरली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हिडिओमध्ये आगीचे भीषण दृश्य कैद - 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये दिसते की, आग एका मजल्यावरून संपूर्ण इमारतीत पसरली असून मॉल पूर्णपणे जळून खाक झाला आहे. नागरिक ओरडत असून मदतीचा प्रयत्न करत आहेत. परंतु, ही आग संपूर्ण इमारतीला वेढली असल्याने आतमध्ये अडकलेल्यांना वाचवणे, तेथील नागरिकांना शक्य झाले नाही.  

इराक शॉपिंग मॉल आग, पहा व्हिडिओ - 

हेही वाचा - तामिळनाडूमध्ये डिझेल वाहून नेणाऱ्या मालगाडीला भीषण आग; मोठे नुकसान

आगीत होरपळून 50 जाणांचा मृत्यू - 

राज्यपाल मोहम्मद अल-मियाही यांनी सांगितले की, या दुर्घटनेत मृतांची आणि जखमींची संख्या 50 पेक्षा जास्त आहे. अनेकजण बेपत्ता असून बचाव पथक सतत शोध घेत आहे. रुग्णालयांमध्ये बेड कमी पडत असून जखमींवर उपचार सुरू आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेमुळे देशभरातून दुःख आणि संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - हुथी बंडखोरांनी मालवाहू जहाजावर घडवून आणला स्फोट! टायटॅनिकसारखे बुडाले जहाज

5 दिवसांपूर्वीच सुरू झाला होता मॉल

आगीची भीषणता लक्षात घेता, या मॉलचे फायर सेफ्टी उपाय अपुरे होते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण हा मॉल केवळ 5 दिवसांपूर्वी उघडण्यात आला होता. आग पहिल्या मजल्यावरून सुरू झाली आणि काही क्षणांत संपूर्ण इमारतीला वेढली. राज्यपाल मियाही यांनी तीन दिवसांचा शोक जाहीर करत मॉलच्या मालकावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल, असं आश्वासन दिलं आहे. या घटनेने इराकच्या सुरक्षाव्यवस्थेवर आणि सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षा उपायांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
 


सम्बन्धित सामग्री