नागपूर: 9 सप्टेंबर 2025 पासून आशिया कप 2025 सुरू झाला आहे. तसेच, रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025 सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी क्रिक्रेटप्रेमींमध्ये उत्साह दिसत आहे. आशिया कप 2025 सामन्यात भारतीय संघाचा विजय व्हावा, यासाठी नागपुरातील क्रिक्रेटप्रेमी खामला येथील हनुमान मंदिरात टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो आणि हातात तिरंगा घेऊन होम हवन करायला सुरूवात झाली आहे. सोबतच, भारतीय संघाच्या विजयासाठी क्रिक्रेटप्रेमी जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
एकीकडे, या सामन्यासाठी क्रिक्रेटप्रेमींमध्ये उत्साह दिसत आहे तर दुसरीकडे, पहलगाममधील दहशतवादी हल्लाच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. मात्र, तरीही क्रेंद्र सरकारने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला परवानगी दिल्याने, या सामन्याला तीव्र निषेध केला जात आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025 सामना कुठे पाहाल?
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 14 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. भरतात, सोनी स्पोर्टस नेटवर्ककडे आशिया कप 2025 चे अधिकृत प्रक्षेपण हक्क आहेत. प्रेक्षक भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025 सामना सोनी स्पोर्टस टेन 1, सोनी स्पोर्टस टेन 1 एचडी, सोनी स्पोर्टस टेन 5 आणि सोनी स्पोर्टस टेन 5 एचडी टीव्हीवर थेट पाहू शकतात. सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होतील.
आशिया कप 2025 चे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहेत
तारीख |
सामना |
ठिकाण |
9 सप्टेंबर 2025 |
अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग |
अबू धाबी |
10 सप्टेंबर 2025 |
भारत विरुद्ध युएई |
दुबई |
11 सप्टेंबर 2025 |
बांग्लादेश विरुद्ध हाँगकाँग |
अबू धाबी |
12 सप्टेंबर 2025 |
पाकिस्तान विरुद्ध ओमान |
दुबई |
13 सप्टेंबर 2025 |
बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका |
अबू धाबी |
14 सप्टेंबर 2025 |
भारत विरुद्ध पाकिस्तान |
दुबई |
15 सप्टेंबर 2025 |
युएई विरुद्ध ओमान |
अबू धाबी |
15 सप्टेंबर 2025 |
श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग |
दुबई |
16 सप्टेंबर 2025 |
बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान |
अबू धाबी |
17 सप्टेंबर 2025 |
पाकिस्तान विरुद्ध युएई |
दुबई |
18 सप्टेंबर 2025 |
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान |
अबू धाबी |
19 सप्टेंबर 2025 |
भारत विरुद्ध ओमान |
अबू धाबी |
20 सप्टेंबर 2025 |
बी1 विरुद्ध बी2 |
दुबई |
21 सप्टेंबर 2025 |
ए1 विरुद्ध ए2 |
दुबई |
23 सप्टेंबर 2025 |
ए2 विरुद्ध ए1 |
अबू धाबी |
24 सप्टेंबर 2025 |
ए1 विरुद्ध बी2 |
दुबई |
25 सप्टेंबर 2025 |
ए2 विरुद्ध बी2 |
दुबई |
26 सप्टेंबर 2025 |
ए1 विरुद्ध बी1 |
दुबई |
28 सप्टेंबर 2025 |
अंतिम सामना |
दुबई |
|
|
|