नवी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत धावत्या कारमधून जीवघेणे स्टंट करण्याचा प्रकार वाढत आहे. हुल्लडबाज तरुणांच्या जीवघेण्या स्टंटमुळे स्वतःचे तसेच इतरांच्या जीवाला देखील धोका निर्माण होत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
नवी मुंबईत हुल्लडबाज तरुणांनी धूमाकूळ घातला आहे. ही घटना नवी मुंबईतील बेलापूरमध्ये घडली आहे. धावत्या कारमधून काही हुल्लडबाज तरुण जीवघेणे स्टंट करताना दिसत आहेत. या घटनेमुळे, स्वतःसोबतच इतरांच्या जीवाला देखील धोका निर्माण होत आहे. ही घटना पहाटे 3 च्या सुमारास घडली. हे तरुण दिवाळे गाव सिग्नल ते बेलापूर मेकडोनाल्ड पर्यंत चारचाकीच्या दरवाजाच्या खिडकीत बसून स्टंट करत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या चारचाकी गाडीच्या दरवाजाच्या खिडकीत बसून तरुणांनी धूमाकूळ घातला आहे, त्या गाडीचा नंबर आहे MH 04 FZ 3022. या घटनेमुळे, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.