Sunday, September 14, 2025 07:15:02 PM

India Vs Pakistan Asia Cup Match 2025 : भारतीय संघाच्या विजयासाठी नागपुरात क्रिकेट प्रेमींकडून हनुमान मंदिरात होम हवन

9 सप्टेंबर 2025 पासून आशिया कप 2025 सुरू झाला आहे. तसेच, रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025 सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे.

india vs pakistan asia cup match 2025  भारतीय संघाच्या विजयासाठी नागपुरात क्रिकेट प्रेमींकडून हनुमान मंदिरात होम हवन

नागपूर: 9 सप्टेंबर 2025 पासून आशिया कप 2025 सुरू झाला आहे. तसेच, रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025 सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी क्रिक्रेटप्रेमींमध्ये उत्साह दिसत आहे. आशिया कप 2025 सामन्यात भारतीय संघाचा विजय व्हावा, यासाठी नागपुरातील क्रिक्रेटप्रेमी खामला येथील हनुमान मंदिरात टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो आणि हातात तिरंगा घेऊन होम हवन करायला सुरूवात झाली आहे. सोबतच, भारतीय संघाच्या विजयासाठी क्रिक्रेटप्रेमी जोरदार घोषणाबाजी करत आहेत. 

एकीकडे, या सामन्यासाठी क्रिक्रेटप्रेमींमध्ये उत्साह दिसत आहे तर दुसरीकडे, पहलगाममधील दहशतवादी हल्लाच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. मात्र, तरीही क्रेंद्र सरकारने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला परवानगी दिल्याने, या सामन्याला तीव्र निषेध केला जात आहे. 

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025 सामना कुठे पाहाल?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 14 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. भरतात, सोनी स्पोर्टस नेटवर्ककडे आशिया कप 2025 चे अधिकृत प्रक्षेपण हक्क आहेत. प्रेक्षक भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025 सामना सोनी स्पोर्टस टेन 1, सोनी स्पोर्टस टेन 1 एचडी, सोनी स्पोर्टस टेन 5 आणि सोनी स्पोर्टस टेन 5 एचडी टीव्हीवर थेट पाहू शकतात. सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होतील.

आशिया कप 2025 चे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहेत

तारीख सामना ठिकाण
9 सप्टेंबर 2025 अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग अबू धाबी
10 सप्टेंबर 2025 भारत विरुद्ध युएई दुबई
11 सप्टेंबर 2025 बांग्लादेश विरुद्ध हाँगकाँग अबू धाबी
12 सप्टेंबर 2025 पाकिस्तान विरुद्ध ओमान दुबई
13 सप्टेंबर 2025 बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका अबू धाबी
14 सप्टेंबर 2025 भारत विरुद्ध पाकिस्तान दुबई
15 सप्टेंबर 2025 युएई विरुद्ध ओमान अबू धाबी
15 सप्टेंबर 2025 श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग दुबई
16 सप्टेंबर 2025 बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान अबू धाबी
17 सप्टेंबर 2025 पाकिस्तान विरुद्ध युएई दुबई
18 सप्टेंबर 2025 श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान अबू धाबी
19 सप्टेंबर 2025 भारत विरुद्ध ओमान अबू धाबी
20 सप्टेंबर 2025 बी1 विरुद्ध बी2 दुबई
21 सप्टेंबर 2025 ए1 विरुद्ध ए2 दुबई
23 सप्टेंबर 2025 ए2 विरुद्ध ए1 अबू धाबी
24 सप्टेंबर 2025 ए1 विरुद्ध बी2 दुबई
25 सप्टेंबर 2025  ए2 विरुद्ध बी2 दुबई
26 सप्टेंबर 2025 ए1 विरुद्ध बी1  दुबई
28 सप्टेंबर 2025 अंतिम सामना दुबई
     

सम्बन्धित सामग्री