Sunday, September 14, 2025 09:43:04 PM

Online Betting App Case: उर्वशी रौतेला आणि माजी TMC खासदार मिमी चक्रवर्ती यांना ED चे समन्स; काय आहे नेमके प्रकरण?

उर्वशी रौतेला यांना 16 सप्टेंबर रोजी ईडीच्या दिल्ली मुख्यालयात हजर राहावे लागणार आहे. तर मिमी चक्रवर्ती यांना 15 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

online betting app case उर्वशी रौतेला आणि माजी tmc खासदार मिमी चक्रवर्ती यांना ed चे समन्स काय आहे नेमके प्रकरण

Online Betting App Case: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) माजी खासदार तसेच बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स बजावले आहे. बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग अॅप 1xBet प्रकरणातील चौकशीसाठी दोघींना बोलावण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वशी रौतेला यांना 16 सप्टेंबर रोजी ईडीच्या दिल्ली मुख्यालयात हजर राहावे लागणार आहे. तर मिमी चक्रवर्ती यांना 15 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

या प्रकरणामुळे दोन्ही अभिनेत्रींच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेषतः मिमी चक्रवर्ती या एकेकाळच्या लोकप्रिय टीएमसी खासदार असून, बंगाली चित्रपटसृष्टीतही त्यांचा मोठा दबदबा आहे. त्यामुळे राजकारण आणि मनोरंजन विश्व या दोन्ही क्षेत्रांचे लक्ष आता या प्रकरणाकडे लागले आहे.

1xBet प्रकरण आणि ईडीची कारवाई

1xBet हा एक बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात ईडीने आधीच अनेक चित्रपट अभिनेते, अभिनेत्री तसेच क्रिकेटपटूंची चौकशी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही नामांकित व्यक्तींनी या अॅपचे प्रमोशन केले होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले. त्यामध्ये उर्वशी रौतेला आणि मिमी चक्रवर्ती यांचीही नावे पुढे आली आहेत.

हेही वाचा - Dashavatar Movie Box Office Collection: 'कोकणचा कांतारा' हिट की फ्लॉप? दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई!

आता चौकशी एजन्सी ईडी चौकशी दरम्यान हे जाणून घेऊ इच्छिते की - मिमी चक्रवर्ती आणि उर्वशी रौतेला यांना या बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅपद्वारे काही पैसे मिळाले की नाही? या बेटिंग अ‍ॅपशी संबंधित लोकांनी, आरोपींनी त्यांचा संपर्क साधला होता की नाही? याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तपास एजन्सीकडे असलेले पुरावे आणि इनपुट अधिक चांगल्या प्रकारे तपासण्यासाठी या दोन्ही चित्रपट अभिनेत्रींची चौकशी केली जाईल. त्यानंतर, या प्रकरणातील तपासाची व्याप्ती अधिक तपशीलवार वाढवली जाईल.

हेही वाचा - Disha Patani House Firing Case: 'आम्ही सनातनी आहोत...' दिशा पटानीच्या घरावरील गोळीबारावर अभिनेत्रीच्या वडिलांची प्रतिक्रिया

अनेक अ‍ॅप्सचा सहभाग 

अभिनेत्यांव्यतिरिक्त, ईडी अधिकाऱ्यांनी या बेकायदेशीर अ‍ॅप बेटिंग प्रकरणात माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांचीही चौकशी केली आहे. या बंदी घातलेल्या अ‍ॅप्समध्ये xBet, Fairplay, Parimatch आणि Lotus 365 यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या समन्सनंतर दोन्ही अभिनेत्रींच्या बाजूने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र तपास अधिकाऱ्यांच्या चौकशीदरम्यान नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 


सम्बन्धित सामग्री