IND vs PAK Asia Cup 2025 Toss: आशिया कप 2025 मध्ये आज सहावा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाला या वेळचा स्पर्धेतील प्रमुख दावेदार मानले जात असून, सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करत आहेत. तर पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्व सलमान आघा करत आहेत. दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनकडे पाहिले तर रोमांचक लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान: साहिबजादा फरहान, सैम अयुब, मोहम्मद हरिस (यष्टिरक्षक), फखर जमान, सलमान आघा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद.
हेही वाचा - World Boxing Championship: कौतुकास्पद! वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मीनाक्षी हुड्डाने पटकावले सुवर्णपदक!
खेळाडूंची अलीकडील कामगिरी
टीम इंडियाचा युवा फलंदाज तिलक वर्माने गेल्या 10 टी20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये 82.06 च्या सरासरीने 413 धावा केल्या आहेत. तिलक वर्मा व्यतिरिक्त, अभिषेक शर्माने 10 डावांमध्ये 204.02 च्या स्ट्राइक रेटने 406 धावा केल्या आहेत. तथापी, गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने 10 सामन्यांत 27 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानकडून सॅम अयुबने 10 डावांमध्ये 262 धावा केल्या असून, साहिबजादा फरहानने 10 डावांमध्ये 246 धावा केल्या आहेत. मोहम्मद नवाजने 10 सामन्यांत 6.44 च्या इकॉनॉमीने 20 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा - Hong Kong Open 2025: सात्विक-चिरागचे स्वप्न भंगले! हाँगकाँग ओपनच्या अंतिम फेरीत चिनी जोडीकडून पराभव
आशिया कपच्या टी-20 फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा भिडले आहेत. त्यात भारताने दोन वेळा विजय मिळवला, तर पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे. एकूणच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये 13 वेळा लढत झाली असून, भारताने 10 विजय मिळवले आहेत, तर पाकिस्तानला 3 विजय मिळाले आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा असून, चाहत्यांमध्ये सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.