LG Electronics IPO: दक्षिण कोरियाची आघाडीची ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाला त्यांच्या बहुप्रतिक्षित 15,000 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीकडून हिरवा कंदील मिळाला आहे. ईटी ब्युरोच्या अहवालानुसार, कंपनीने डिसेंबर 2024 च्या पहिल्या आठवड्यात सेबीकडे त्यांचे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केले होते. या आयपीओद्वारे, कंपनी भारतात आपला पहिला सार्वजनिक प्रस्ताव सादर करणार आहे.
देशातील पाचवा सर्वात मोठा IPO -
या आयपीओचा आकार सुमारे 15,000 कोटी रुपये असण्याची अपेक्षा आहे, जो देशातील पाचवा सर्वात मोठा आयपीओ असेल. यापूर्वी, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC), ह्युंदाई मोटर इंडिया, पेटीएम आणि कोल इंडियाचे आयपीओ भारतातील सर्वात मोठे सार्वजनिक ऑफर राहिले आहेत. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे प्रमोटर एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंक त्यांचे संपूर्ण 15% हिस्सेदारी विकणार आहे. कंपनीचा आयपीओ पूर्णपणे ऑफर-फॉर-सेल (ओएफएस) असेल. शेअर बाजारात मोठ्या आयपीओची मागणी वाढत असताना कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - महाकुंभात 30 कोटी रुपये कमावणाऱ्या नाविकाला आयकर विभागाची नोटीस; काय आहे प्रकरण? वाचा
एअर कंडिशनर क्षेत्रातील LG दुसरी सर्वात मोठी कंपनी -
भारतीय ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये कंपनी अव्वल स्थानावर आहे. याशिवाय, एअर कंडिशनर क्षेत्रातील ही दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचा आयपीओ हा दक्षिण कोरियाचा भारतात सूचीबद्ध होणारा दुसरा सर्वात मोठा आयपीओ असेल. यापूर्वी, ऑक्टोबर 2024 मध्ये, ह्युंदाई मोटर इंडियाने 27,870 कोटी रुपयांचा आयपीओ ऑफर केला होता, जो 2.37 पट जास्त सबस्क्राइब झाला होता. हा आयपीओ भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आहे, जो एलआयसीच्या 21,008 कोटी रुपयांच्या आयपीओला मागे टाकतो.
हेही वाचा- RBI लवकरच जारी करणार 100 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा! जुन्या नोटांचे काय होणार? जाणून घ्या
दरम्यान, एलजीने 1997 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. कंपनीने भारतात दोन उत्पादन केंद्रे स्थापन केली, पहिले ग्रेटर नोएडा येथे आणि दुसरे पुण्याजवळ. भारतात विकल्या जाणाऱ्या जवळपास 98 टक्के उत्पादनांचे उत्पादन एलजी येथे करते.
Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!