Wednesday, August 20, 2025 04:33:09 AM

Bus Accident : पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमानमध्ये बस अपघात; 10 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी

पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान येथे शुक्रवारी झालेल्या बस अपघातात दोन महिला आणि आठ पुरुषांसह दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

bus accident  पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमानमध्ये बस अपघात 10 जणांचा मृत्यू 25 जण जखमी

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान येथे शुक्रवारी झालेल्या बस अपघातात दोन महिला आणि आठ पुरुषांसह दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या अपघातात 25 जण जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बर्धमान मेडिकल कॉलेजचे अधीक्षक तपोश घोष यांनी एएनआयला सांगितले की, जखमींपैकी पाच जण गंभीर जखमी आहेत. "दोन महिला आणि आठ पुरुषांसह दहा जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून 25 जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 25 जखमींपैकी पाच जणांना गंभीर दुखापत झाली आहे. गंगा सागर येथून येत असताना त्यांच्या बसला अपघात झाल्याचे घोष यांनी सांगितले. 

हेही वाचा : PM Narendra Modi on Youth : पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना केंद्र सरकार देणार 15,000 रुपये ; जाणून घ्या


सम्बन्धित सामग्री