शिमला: शिमला जिल्ह्यातील चिरगाव परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. चार तरुण प्रवास करत असलेली कार अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळली आणि थेट पब्बर नदीत पडली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे.
दरीतून थेट नदीत कोसळली कार -
प्राप्त माहितीनुसार, हा अपघात सीमा हरसुख रिसॉर्टजवळील पेट्रोल पंपाजवळ रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडला. कारने ओव्हरटेक करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार थेट खोल दरीत जाऊन पब्बर नदीत कोसळली.
हेही वाचा - भारतात आतापर्यंत कितीवेळा ढगफुटी झाली? विनाशकारी ढगफुटीच्या घटनांमध्ये गेला 'इतक्या' लोकांचा जीव
स्थानिकांनी जोरदार आवाज ऐकल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. त्याचवेळी पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल होताच स्थानिकांच्या मदतीने तात्काळ तीन तरुणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. अपघातातील एक तरुण बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - Uttarkashi Cloudburst Update: उत्तरकाशीत ढगफुटीमुळे 200 हून अधिक जण बेपत्ता, आतापर्यंत 130 लोकांची सुटका
प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुण हे मुच्छडा आणि ढाक गावातील असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप मृतांची अधिकृत ओळख जाहीर केलेली नाही. घटनेनंतर पोलिसांनी तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या अपघातामुळे डोंगराळ भागांमध्ये वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
पब्बर नदीत कोसळली कार, पहा व्हिडिओ -
जुलैमध्येही घडला होता अशाच स्वरूपाचा अपघात -
याआधीही, 19 जुलै रोजी, शिमलाच्या रौला कलार लिंक रोडवर बधोन गावाजवळ वाहन दरीत कोसळल्याने प्रमोद कुमार, कृष्णा आणि त्यांची मुलगी शालू यांचा मृत्यू झाला होता. या अपघातातही चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते.