Monday, September 01, 2025 02:38:07 PM

CBI Raids Anil Ambani House: 17 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ED नंतर आता सीबीआयचा अनिल अंबानींच्या घरावर छापा

सीबीआयने आरकॉमविरुद्ध बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडिया ला तब्बल 2000 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी सीबीआयची पथके आज मुंबईत विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.

cbi raids anil ambani house 17 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ed नंतर आता सीबीआयचा अनिल अंबानींच्या घरावर छापा

CBI Raids Anil Ambani House: देशातील मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि तिचे प्रवर्तक संचालक अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. प्राप्त माहितीनुसार, सीबीआयने आरकॉमविरुद्ध बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडिया ला तब्बल 2000 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी सीबीआयची पथके आज मुंबईत विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.

एसबीआयने 13 जून 2025 रोजी हे खाते फसवणूक श्रेणीत वर्गीकृत केले होते. आरबीआयच्या फसवणूक जोखीम व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि बँकेच्या बोर्ड-मंजूर धोरणानुसार हे पाऊल उचलण्यात आले. त्यानंतर 24 जून रोजी बँकेने आरबीआयला अधिकृतरीत्या याची माहिती दिली आणि सीबीआयमध्ये तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात या प्रकरणाचा तपशील दिला होता. त्यांनी सांगितले होते की, बँकेने अहवाल सादर केला असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता सीबीआयने औपचारिक कारवाई हाती घेतली आहे.

हेही वाचा - Jagdeep Dhankhar : सध्या काय करतायत जगदीप धनखड? त्यांच्या दिनचर्येबद्दल ही खास माहिती आली समोर

सीबीआयपूर्वी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अनिल अंबानींच्या आर्थिक व्यवहारांवर कारवाई करत होते. ईडीने अनिल अंबानींशी संबंधित 17,000 कोटी कर्ज घोटाळा प्रकरणी चौकशी केली होती. त्यावेळी 50 व्यावसायिक संस्था आणि 25 व्यक्तींशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते.

हेही वाचा - Marathi-Non Marathi Controversy : 'मराठी लोगों की औकात क्या?, तुम मराठी लोक भंगार हो'; म्हणणाऱ्या परप्रांतियाला मनसैनिकांनी चोपला

एसबीआयनेकडून कारणे दाखवा नोटिस - 

बँकेनुसार, डिसेंबर 2023, मार्च 2024 आणि सप्टेंबर 2024 मध्ये कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. कंपनीला कर्जाच्या अटींचे उल्लंघन का झाले हे स्पष्ट करण्यात अपयश आले. तसेच खात्यातील आर्थिक व्यवहारांबद्दल योग्य माहिती न दिल्यामुळे एसबीआयने खाते फसवे म्हणून घोषित केले. सध्या सीबीआयच्या कारवाईमुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री