Bird Hits Air India Express Flight: विजयवाडा ते बेंगळुरूला जाणारी एअर इंडिया एक्सप्रेसची फ्लाइट गुरुवारी रद्द करण्यात आली. विमान धावपट्टीवर असताना अचानक एका गरुडाने विमानाच्या समोरील भागाला धडक दिली. त्यामुळे सुरक्षा धोक्यामुळे तातडीने हे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था
एअरलाइनने बाधित प्रवाशांना इतर फ्लाइटमधून प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली. तसेच झालेल्या गैरसोयीबद्दल माफीही मागण्यात आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षा प्रोटोकॉलची पुन्हा तपासणी सुरू आहे.
हेही वाचा - GST Changes: GST च्या नवीन दरांचा सर्वसामान्यांवर परिणाम! काय स्वस्त आणि काय महाग झाले? जाणून घ्या संपूर्ण यादी
दरम्यान, 3 सप्टेंबरला तिरुचिरापल्लीहून येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पर्यायी विमानाची व्यवस्था करावी लागली. 31 ऑगस्टला दिल्ली-इंदूर एअर इंडियाच्या फ्लाइटला इंजिनमध्ये आग लागल्यामुळे टेकऑफनंतर लगेच परत आणावे लागले. पायलट्सनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत सुरक्षित लँडिंग केले.
हेही वाचा - GST Council Meeting 2025 : जीएसटी 2.0 चे अनावरण! दोन स्लॅबची रचना मंजूर, नवीन दर 22 सप्टेंबरपासून लागू
पक्ष्यांच्या धडकेचा कायम धोका
विमानतळ परिसरातील पक्षांची धडक ही विमान कंपन्यांसाठी मोठे आव्हान आहे. टॅक्सींग व टेकऑफदरम्यान हे धोके वाढतात. त्यामुळे विमान वाहतूक प्राधिकरण आणि एअरलाइन कंपन्या अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि धोरणांवर काम करत आहेत. या घटनेनंतर प्रवासी सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.