Amit Mishra Announces Retirement: अनुभवी भारतीय लेग-स्पिनर अमित मिश्रा यांनी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आज अमित मिश्राच्या 25 वर्षांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला आहे. अमित मिश्राने 22 कसोटी, 36 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून, अनुक्रमे 76, 64 आणि 16 बळी घेतले आहेत.
गुरुवारी दिलेल्या निवेदनात मिश्रा म्हणाले की, 'वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे तसेच पुढच्या पिढीतील क्रिकेटपटूंना अधिक संधी मिळावी यासाठी मी निवृत्तीचा निर्णय घेतला. माझ्या क्रिकेटमधील आयुष्यातील ही 25 वर्षे संस्मरणीय राहिली आहेत. बीसीसीआय, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, सपोर्ट स्टाफ, सहकारी खेळाडू, कुटुंब आणि चाहत्यांचे मनापासून आभार.'
हेही वाचा - Betting App Case : Shikhar Dhawan आज ईडीसमोर हजर होणार; सुरेश रैनाप्रमाणेच कसून चौकशी
मिश्राने 2003 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 2008 मध्ये मोहाली कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करताना त्याने पाच बळी घेण्याचा पराक्रम केला. 2013 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांत 18 बळी घेऊन त्याने जवागल श्रीनाथच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी केली. त्याचबरोबर, 2014 मध्ये बांगलादेशातील टी-20 विश्वचषकात त्याने 10 बळी घेत प्रभावी कामगिरी केली.
हेही वाचा - T20 International Match: षटकारांशिवाय 'या' खेळाडूने टी-20 मध्ये केल्या सर्वाधिक धावा
मिश्राचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2017 मध्ये झाला. त्यानंतर त्यांनी आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये सहभाग सुरू ठेवला. 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना हा त्यांचा अखेरचा स्पर्धात्मक सामना ठरला. आयपीएलमध्ये मिश्रा यांनी 162 सामन्यांत 174 बळी घेतले आहेत. तो या लीगमधील सातव्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
याशिवाय, आयपीएलच्या इतिहासात तीन हॅटट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज असल्याचा अनोखा विक्रमही अमित मिश्राच्या नावावर आहे. विशेष म्हणजे, या हॅटट्रिक 2008 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी, 2011 मध्ये पंजाब किंग्जसाठी आणि 2013 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी घेतल्या होत्या.