Thursday, September 04, 2025 06:32:28 PM

GST 2.0: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जीएसटी सुधारणांमुळे शेतीचा खर्च होणार कमी

परिषदेने जीएसटीच्या मुख्य स्लॅबची संख्या चारवरून दोन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या मोठ्या सुधारणांमुळे शेतीच्या खर्चात लक्षणीय घट होईल आणि यांत्रिकीकरणाला चालना मिळेल.

gst 20 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जीएसटी सुधारणांमुळे शेतीचा खर्च होणार कमी

Farming Costs will Decrease: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी स्पष्ट केले की जीएसटी सुधारणा केवळ कर दर बदलण्यासाठी नसून त्या संरचनात्मक बदल घडवून आणणाऱ्या आहेत. जीएसटी परिषदेच्या 56व्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असून सर्व मंत्र्यांनी कर कपातीला पाठिंबा दर्शवला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की बहुतेक उत्पादनांवरील जीएसटी दर लक्षणीयरीत्या कमी करण्यात आले आहेत, विशेषतः शेती, कृषी क्षेत्र आणि आरोग्याशी संबंधित उत्पादनांवर कर कपात करण्यात आली आहे. यामुळे सामान्य जनतेला आणि विविध क्षेत्रांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा - GST Impact on IPL Ticket : क्रीडाप्रेमींच्या खिशाला फटका ! आयपीएल तिकिटांच्या किंमती वाढणार, जाणून घ्या

शेतीच्या खर्चात लक्षणीय घट 

परिषदेने जीएसटीच्या मुख्य स्लॅबची संख्या चारवरून दोन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या मोठ्या सुधारणांमुळे शेतीच्या खर्चात लक्षणीय घट होईल आणि यांत्रिकीकरणाला चालना मिळेल.

शेतीसाठी दिलासा देणारे निर्णय:

ट्रॅक्टरवरील जीएसटी 12% वरून 5% करण्यात आला आहे.
ट्रॅक्टरचे टायर आणि सुटे भाग यांवरील जीएसटी 18% वरून 5% पर्यंत कमी.
कापणी, मळणी आणि शेत तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवरील जीएसटी 12% वरून 5% करण्यात आला.
जैविक कीटकनाशके आणि सूक्ष्म पोषक घटकांवरील जीएसटी 12% वरून 5% पर्यंत घटवला.

हेही वाचा - GST Changes: GST च्या नवीन दरांचा सर्वसामान्यांवर परिणाम! काय स्वस्त आणि काय महाग झाले? जाणून घ्या संपूर्ण यादी

या निर्णयामुळे सिंचनाचा खर्च कमी होईल, शेती उत्पादनाचा खर्च घटेल आणि शेतकऱ्यांच्या खिशावरचा भार हलका होईल. याशिवाय आरोग्यसेवा, शिक्षण, ऑटोमोबाईल आणि घरगुती उपकरणांवरील दरांमध्येही बदल झाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, या सुधारणांमुळे भारताच्या कर प्रणालीमध्ये स्थैर्य येईल आणि डिजिटल अर्थव्यवस्था तसेच ग्रामीण विकासाला गती मिळेल. 


सम्बन्धित सामग्री