Thursday, September 04, 2025 09:36:48 PM

Latest Film Releases : टायगर श्रॉफच्या 'बागी 4' पासून अनुष्काच्या 'घाटी'पर्यंत 'या' खास चित्रपटांची मेजवानी

थिएटरमध्ये एक-दोन नाही तर अनेक चित्रपटांचा मेगा टक्कर होणार आहे.

latest film releases  टायगर श्रॉफच्या बागी 4 पासून अनुष्काच्या घाटीपर्यंत या खास चित्रपटांची मेजवानी

सप्टेंबर महिन्यात चित्रपटप्रेमींसाठी मोठी मेजवानी असणार आहे. 5 सप्टेंबर 2025 रोजी, म्हणजे उद्या, थिएटरमध्ये एक-दोन नाही तर अनेक चित्रपटांचा मेगा टक्कर होणार आहे. यामध्ये अॅक्शनपासून ते सस्पेन्स आणि कॉमेडी ड्रामापर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. 

द बंगाल फाईल्स 
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द बंगाल फाईल्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांमध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत आहेत. काश्मीर फाइल्स, द केरळ फाइल्सनंतर या चित्रपटाला  प्रेक्षकांची किती पसंती मिळणार हे आता पाहण्यासारखं आहे. 

बागी 4  
अभिनेता टायगर श्रॉफचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बागी 4' मध्ये टायगर श्रॉफ, सोनम बाजवा आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्याचबरोबर त्याची प्री-तिकीट विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे.

घाटी
क्रिश जगरलामुडी यांच्या "घाटी" या चित्रपटात अनुष्का शेट्टी आणि विक्रम प्रभू मुख्य भूमिकेत आहेत. हा एक रोमांचक ड्रामा थ्रिलर आहे. नागवेली विद्या सागर यांच्या संगीत आणि उत्कृष्ट दृश्यांसह, हा चित्रपट उद्या म्हणजेच 5 सप्टेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

कॉन्ज्युरिंग 4
हॉलिवूडच्या लोकप्रिय कॉन्ज्युरिंग फ्रँचायझीच्या चौथ्या भागासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. अखेर 'द कॉन्ज्युरिंग 4' उद्या म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.

दिल मद्रासी
5 सप्टेंबर दिल मद्रासी दिग्दर्शित ए.आर. मुरुगदास हा एक सायकॉलॉजिकल ॲक्शन थ्रिलर आहे. ज्यामध्ये शिवकार्तिकेयन, रुक्मिणी वसंत आणि विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत आहेत. अनिरुद्धच्या दमदार अभिनय आणि संगीताने सजलेला हा चित्रपट 5 सप्टेंबर 2025  रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.


 


सम्बन्धित सामग्री