Thursday, September 04, 2025 09:14:46 PM

The Bengal Files : 'द बंगाल फाइल्स' वादाच्या भोवऱ्यात, पल्लवी जोशींची राष्ट्रपतींना विनंती

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री &quotद काश्मीर फाईल्स' चित्रपटानंतर 'द बंगाल फाइल्स' चित्रपट घेऊन येत आहेत. परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला आहे.

the bengal files  द बंगाल फाइल्स वादाच्या भोवऱ्यात पल्लवी जोशींची राष्ट्रपतींना विनंती

मुंबई: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री "द काश्मीर फाईल्स' चित्रपटानंतर 'द बंगाल फाइल्स' चित्रपट घेऊन येत आहेत. परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला आहे. पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटाला विरोध होत आहे. याच कारणामुळे अनेक मल्टिप्लेक्स मालकांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता चित्रपटाच्या निर्मात्या आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी थेट देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे मदतीचा हात मागितला आहे. 

पल्लवी जोशींची राष्ट्रपतींना विनंती
चित्रपटाच्या निर्मात्या पल्लवी जोशी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे  मदत मागितली आहे. या पोस्टमध्ये, "मी 'द बंगाल फाइल्स' चित्रपटाची निर्माती आहे आणि मला खूप दुःख होत आहे की, राजकीय दबावामुळे माझ्या चित्रपटाला बंगालमध्ये प्रदर्शित होण्यापासून रोखलं जात आहे." 

हेही वाचा: Latest Film Releases : टायगर श्रॉफच्या 'बागी 4' पासून अनुष्काच्या 'घाटी'पर्यंत 'या' खास चित्रपटांची मेजवानी

पुढे बोलताना, तुम्ही यात हस्तक्षेप करून माझ्या संवैधानिक हक्कांचं रक्षण करा आणि बंगालमध्ये चित्रपट प्रदर्शित होईल, याची खात्री करा अशी विनंती त्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले आहे. 

 

द बंगाल फाइल्सच्या ट्रेलर रिलीजच्या वेळीही गोंधळ
'द बंगाल फाइल्स' चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजच्या वेळीही मोठा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज कार्यक्रम कोलकातामध्ये आयोजित केला होता, पण तिथे विरोधकांनी गदारोळ केला. तरीही ट्रेलर रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही घटनेचा निषेध केला होता. आता त्यांची पत्नी आणि चित्रपटातील अभिनेत्री पल्लवी जोशींनीही चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी राष्ट्रपतींना पोस्टद्वारे विनंती केली आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, शाश्वत चटर्जी यांसारखे मोठे कलाकार आहेत. 'द बंगाल फाइल्स' 5 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. 

 


सम्बन्धित सामग्री