Ancient Tomb Robbery : अनेकांना रहस्यमयी गोष्टी वाचण्याची आवड असते. यातील रहस्य खिळवून ठेवणारे असते हे खरे आहे. पण अशा रहस्यकथा वाचून कोणी चोरी करू शकते का? किंवा एखाद्या चोराला रहस्यकथा वाचण्याचा छंद असू शकतो का? या दोन्ही शक्यतांपैकी काहीतरी घडले आणि एका महाभागाने शेकडो वर्ष जुनी कबर शोधून ती खोदून काढली.
जुन्या कबरी आणि त्यामध्ये लपलेल्या खजिन्याशी संबंधित कथा वाचल्यानंतर, एका माणसाने अशीच एक कबर शोधून ती लुटण्याची योजना आखली. जुन्या कबरीच्या चोरीशी संबंधित कथा वाचल्यानंतर, त्या माणसाने अडीच हजार वर्षांहून अधिक जुनी कबर खोदली आणि त्यातून खजिना बाहेर काढला. मग तो पोलिसांच्या तावडीत सापडला.
जुन्या रहस्यमय कबरींशी संबंधित कथा वाचण्याची आवड असलेल्या एका माणसाला यातून प्रेरणा मिळाली आणि तो खऱ्या आयुष्यात एक प्राचीन कबर शोधण्यासाठी निघाला. या दरम्यान, त्याला एक हजार वर्ष जुनी कबर देखील सापडली. मग त्याने काही गुन्हेगारांसह एक टीम तयार केली आणि कबर खोदून गुप्त खजिना बाहेर काढण्याची योजना आखली. तो यात यशस्वी झाला. परंतु, हा खजिना विकताना त्याला अटक करण्यात आली.
हेही वाचा - AI Use Proved Fatal: ChatGPT वर आंधळा विश्वास ठरला घातक; सामान्य लक्षणांमागे निघाला प्राणघातक कर्करोग
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चीनमधील एक व्यक्ती प्राचीन आणि रहस्यमय कबरीच्या कथा वाचण्यात इतका बुडाला की, त्याने खऱ्या आयुष्यात ती लुटण्याची योजना आखली. मग तो एका प्राचीन स्मशानभूमीत गेला आणि त्याने 771 ईसापूर्व काळातील एक थडगे खोदले आणि त्यातून 20 प्राचीन मौल्यवान अवशेष चोरले.
अशा प्रकारे सूत्रधाराने कबर लुटण्याची योजना आखली. मध्य चीनमधील हुबेई प्रांतातील यू नावाचा हा सूत्रधार दररोज थडगे लुटण्यासंबंधीच्या कादंबऱ्या वाचत असे. मात्र, त्याचे फक्त कथा वाचून समाधान झाले नाही. तेव्हा तो कथांमध्ये उल्लेख केलेल्या जुनी थडगी आणि कबरींची चौकशी आणि संशोधन करू लागला. जेव्हा जेव्हा त्याला कोणतेही संशयास्पद किंवा अस्पष्ट दावे आढळले तेव्हा तो अनेकदा स्थानिक काउंटी रेकॉर्डसह ते तपासत असे.
यू म्हणाला की, मी फक्त वाचत राहिलो आणि मी जितके जास्त वाचत राहिलो तितके माझे वेड वाढत गेले. मी जुन्या थडग्यांचा अधिक खोलवर शोध घेऊ लागलो, जसे की कोणता राजवंश? कोण महत्त्वाची व्यक्ती? ही थडगी कशी बांधली गेली? यापैकी काही प्रत्यक्षात अस्तित्वात होती.
तो खजिन्याने भरलेल्या रहस्यमय थडग्यांच्या कथांनी प्रभावित झाला होता. त्याचे सर्वात मोठे आकर्षण कादंबऱ्यांमध्ये वर्णन केलेली तथाकथित रहस्यमय थडगी होती, ज्यामध्ये खजिना लपलेला असल्याचा दावा केला जात होता. म्हणून त्याने कादंबऱ्यांमध्ये वर्णन केलेली थडगी लुटण्याच्या काल्पनिक पद्धती प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला.
गुओ कुटुंबाच्या थडग्यांमध्ये पुरातत्वीय शोध लागल्याची सूचना त्याला फोनवर मिळाली, तेव्हा खऱ्या आयुष्यात ही थडगी उकरून काढण्याचा त्याचा प्रयत्न सुरू झाला. हा परिसर हुबेईमधील एक संरक्षित सांस्कृतिक वारसा स्थळ आहे, ज्याचे उत्खनन 20 वर्षांपूर्वी महामार्गाच्या बांधकामादरम्यान पहिल्यांदा करण्यात आले होते.
फोनमध्ये सापडल्या जुन्या थडग्याशी संबंधित सूचना
या सूचनेमध्ये म्हटले आहे की, उत्खननात मोठ्या प्रमाणात कांस्य कलाकृती सापडल्या आहेत. यामुळे यू येथील थडगी खोदून काढण्यास उत्सुक झाला होता आणि त्याने पहिल्यांदाच बेकायदेशीर उत्खनन करण्याचा प्रयत्न केला. लीने ताबडतोब चेन नावाच्या एका व्यक्तीला आणि इतर साथीदारांना मदतीसाठी त्याच्या टीममध्ये समाविष्ट केले.
बऱ्याच संशोधनानंतर चोरी झाली
यू याने नंतर कबूल केले की, त्याने हा शोध आणि चोरी करण्यासाठी प्रथम आसपासच्या पर्वतरांगांच्या लेआउटचा अभ्यास केला. त्यानंतर त्याने थडग्यात जिथे खजिना लपवला होता त्या ठिकाणी हळूहळू पोहोचण्यासाठी एक प्रोब टूल आणि लुओयांग फावडे (खोदण्यासाठी वापरले जाणारे एक विशेष चिनी साधन) वापरले.
दोन आठवड्यांच्या गुप्त शोधानंतर, यूला शेवटी एका थडग्याचे प्रवेशद्वार दिसले. त्यानंतर त्याने सावधगिरीने फावडे वापरून त्यावर पहिला प्रहार केला. यू म्हणाला, "मी गंजलेले हिरवे काहीतरी पाहिले. मला वाटले की जर हे पृष्ठभागावर असेल तर, खाली जे आहे ते निश्चितच दगड नाही. ते निश्चितच कांस्य होते."
हेही वाचा - Special Offer : या' देशाने दिलीय पर्यटनाची खास ऑफर; आंतरराष्ट्रीय विमान तिकिटावर 2 विमान प्रवास अगदी मोफत
तीन जणांना मिळून 20 प्राचीन कांस्य पुतळे सापडले
दोन रात्रींच्या कालावधीत, तिघांनी 20 कांस्य कलाकृती खोदण्यासाठी अथक परिश्रम केले. जलद पैसे कमविण्याच्या प्रयत्नात, यूने ली नावाच्या माणसाशी संपर्क साधला जेणेकरून तो त्या मध्यस्थाद्वारे एक श्रीमंत खरेदीदार शोधू शकेल.
नोव्हेंबर 2023 मध्ये, एक पोलीस पथक खरेदीदार म्हणून यूला भेटले. त्याच्याकडे 20 प्राचीन कलाकृती होत्या. त्याची किंमत अंदाजे चार दशलक्ष युआन (US$560,000) किंवा 5 कोटी रुपये होती. परिणामी, सर्व कबर चोरांना अखेर अटक करण्यात आली.
सर्व कलाकृतींची किंमत 5 कोटी रुपये होती
तज्ज्ञांच्या मते, सर्व 20 कलाकृती 771 ईसापूर्व काळातील आहेत. यापैकी नऊ राष्ट्रीय प्रथम श्रेणीच्या सांस्कृतिक अवशेष म्हणून वर्गीकृत करण्यात आल्या आहेत. खटल्याची सुनावणी झाल्यानंतर, यू आणि चेन यांना प्रत्येकी 10 वर्षे आणि तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा आणि पुरातत्व बचाव खर्च भागवण्यासाठी 70,000 युआन (10,000 अमेरिकन डॉलर्स) दंड ठोठावण्यात आला. त्याच वेळी, मध्यस्थ ली याला गुन्हेगारी उत्पन्न लपवल्याबद्दल तीन वर्षे आणि सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.