Inga Ruginiene New PM Of Lithuania : लिथुआनियाच्या संसदेने मंगळवारी मोठ्या राजकीय गोंधळादरम्यान देशाला नवीन पंतप्रधान मिळाले. माजी ट्रेड युनियन नेत्या आणि 44 वर्षीय राजकारणी इंगा रुगिनीन यांची संसदेने 78 विरुद्ध 35 मतांनी देशाच्या नवीन पंतप्रधान म्हणून निवड केली. त्यांच्या आधीच्या पंतप्रधान गिनटौटास पालुकास यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक झाली.
युरोपमध्ये लिथुआनिया हा एक छोटासा देश आहे, जो फारसा चर्चेत नसतो, मात्र, या देशाच्या पंतप्रधानपदी एका महिलेची निवड झाली आहे. लिथुआनिया या देशाच्या पंतप्रधान पदी एका 44 वर्षीय महिलेची निवड झाली आहे. या महिलेचं सौंदर्य आणि राहणीमान एखाद्या मॉडेलसारखं किंवा अभिनेत्रीसारखं आहे. त्यांच्या सौंदर्यासोबतच त्यांची राजकारणातील समजही जगभरात चर्चेत असते. इंगा रुगीनीने यांनी त्यांच्या राजकीय जीवनात मजुरांच्या अडचणींविषयी त्यांना विशेष आत्मियता आहे. त्यासाठी त्यांनी खूप सामाजिक कार्यही केलं आहे.
लिथुआनियाच्या नवीन पंतप्रधान इंगा रुगिनीन यांना आता राष्ट्रपतींकडून औपचारिकपणे नियुक्ती पत्र स्वीकारावे लागेल आणि संसदेत शपथ घ्यावी लागेल. त्यानंतर, त्या अधिकृतपणे देशाच्या पंतप्रधान होतील आणि येत्या काळात त्यांची खरी परीक्षा प्रशासन आणि स्थिरता राखण्याची असेल.
इंगा रुगीनी या लिथुआनिया या देशाच्या मजूर महासंघाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. तसेच त्यांनी याआधी संरक्षण आणि कामगार मंत्री म्हणूनही काम पाहिलेले आहे. आता त्या पंतप्रधान म्हणून काम करतील.
हेही वाचा - Kim Jong Un - Putin Meet : पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंग उन यांच्या अंगरक्षकांनी सर्व पुरावे मिटवले; Video आला समोर
पालुकास यांना राजीनामा का द्यावा लागला?
गेल्या वर्षीच गिनटौटास पालुकास पंतप्रधान झाले, परंतु त्यांची प्रतिमा सतत प्रश्नचिन्हात राहिली. जुलैमध्ये, अनेक माध्यमांनी त्यांच्या जुन्या आणि सध्याच्या व्यावसायिक व्यवहारांबद्दल गंभीर आरोप केले. यामध्ये आर्थिक अनियमितता आणि जुन्या प्रकरणांशी संबंधित आरोपांचा समावेश होता. या खुलाशांनंतर, देशाच्या भ्रष्टाचारविरोधी आणि कायदा अंमलबजावणी संस्थांनी अधिकृत चौकशी सुरू केली. दबाव वाढताच, जुलैच्या अखेरीस पालुकास यांनी पद सोडले.
इंगा रुगिनिएनी कोण आहेत?
इंगा रुगिनिएनी या ट्रेड युनियन कॉन्फेडरेशनच्या माजी प्रमुख आहेत. गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षात सामील झाल्या. त्यानंतर, त्या पालुकासच्या सरकारमध्ये सामाजिक व्यवहार आणि कामगार मंत्री झाल्या. आता त्या थेट पंतप्रधानपदावर पोहोचल्या आहेत. नवीन पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानंतर, इंगा रुगिनिएनी यांनी संसदेत सांगितले की, 'आमचे उद्दिष्ट स्थिरता पुनस्थापित करणे आणि सरकारने जनतेने सोपवलेले काम करावे याची खात्री करणे आहे.'
राष्ट्रपती नौसेदा यांचा विश्वास
संसदेत इंगा रुगिनिएनी यांना नामांकित करताना, लिथुआनियाचे अध्यक्ष गीतानास नौसेदा म्हणाले की, त्या तडजोड करणाऱ्या, रचनात्मक वाटाघाटी करणाऱ्या आहेत. राष्ट्रपतींनी आशा व्यक्त केली की त्या देशाच्या राजकारणात स्थिरता आणतील.
लिथुआनियामध्ये नवीन युती सरकार
सोशल डेमोक्रॅटिक पक्षाने सोमवारी दोन लहान पक्षांसह एक नवीन मध्य-डाव्या युतीची स्थापना केली. या युतीला संसदेत 141 पैकी 82 जागांचे जोरदार बहुमत आहे. याचा अर्थ असा की रुजेनियनच्या सरकारला स्थिरता मिळेल आणि उर्वरित कार्यकाळात (चार वर्षांचा कालावधी) काम करता येईल.
हेही वाचा - Putin On Multipolar System: जग बहुध्रुवीय असले पाहिजे, कोणीही वर्चस्व गाजवू नये; पुतिन यांचे आवाहन
परराष्ट्र धोरणात कोणताही बदल नाही
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की या बदलाचा लिथुआनियाच्या परराष्ट्र धोरणावर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. राष्ट्राध्यक्ष नौसेदा हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर देशाचा चेहरा राहिले आहेत. रशियाविरुद्धच्या युद्धात त्यांना युक्रेनचे सर्वात मजबूत समर्थक मानले जाते. या भूमिकेला देशातील जवळजवळ सर्व प्रमुख राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे.
लिथुआनियाची धोरणात्मक स्थिती
लिथुआनिया हा युरोपियन युनियन आणि नाटोचा सदस्य आहे. ते रशियाच्या कॅलिनिनग्राड एक्सक्लेव्ह आणि रशिया समर्थक बेलारूसच्या सीमेवर आहे. हेच कारण आहे की सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण नेहमीच येथे एक प्रमुख मुद्दा राहते.