संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्याला उत्सहात पार पडत आहे . जागो-जागी, गल्ली-गल्लीमध्ये बाप्पाचे आगमन झाले. सर्वानीच बाप्पाची मनोभावे पूजा केली. मात्र आता काही दिवसातच लाड्क्याला गणरायाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी अकरा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. अशातच सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
तेलंगणा सरकारने शनिवार, 6 सप्टेंबर 2025 रोजी हैदराबाद, सिकंदराबाद, रंगारेड्डी आणि मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये सामान्य सुट्टी म्हणून घोषित केली आहे. ही सुट्टी गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या दिवसाच्या ऐवजी 11 ऑक्टोबर 2025 (दुसरा शनिवार) हा दिवस कामकाजी दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.
हेही वाचा - GST : सेसच्या 'या' प्रकारांमुळे मिळाली GST वर मोठी सूट, जाणून घ्या
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर, तेलंगणा उच्च न्यायालयानेही 6 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या आदेशानुसार हैदराबाद आणि सिकंदराबादमधील न्यायालये, तसेच इतर संबंधित कार्यालये या दिवशी बंद राहतील.
हेही वाचा - GST Impact on IPL Ticket : क्रीडाप्रेमींच्या खिशाला फटका ! आयपीएल तिकिटांच्या किंमती वाढणार, जाणून घ्या
गणेश विसर्जनाच्या दिवशी हैदराबादमध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यात प्रमुख आकर्षण म्हणजे खैरताबाद गणेश विसर्जन मिरवणूक, जी लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेते. या मिरवणुकीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचा समावेश असतो.