Thursday, September 04, 2025 06:03:39 PM

Chaos in West Bengal Assembly: पश्चिम बंगाल विधानसभेत गोंधळ! अल्पसंख्याक विधेयकावरून BJP-TMC आमदारांमध्ये हाणामारी

अल्पसंख्याकांशी संबंधित विधेयकावर चर्चा सुरू असताना भाजप आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आमदार आमनेसामने आले. त्यानंतर प्रकरण इतके वाढले की, येथे हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली.

chaos in west bengal assembly पश्चिम बंगाल विधानसभेत गोंधळ अल्पसंख्याक विधेयकावरून bjp-tmc आमदारांमध्ये हाणामारी

Chaos in West Bengal Assembly: बुधवारी पश्चिम बंगाल विधानसभेत प्रचंड गोंधळ उडाला. अल्पसंख्याकांशी संबंधित विधेयकावर चर्चा सुरू असताना भाजप आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आमदार आमनेसामने आले. त्यानंतर प्रकरण इतके वाढले की, येथे हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली. गोंधळ वाढल्याने विधानसभा अध्यक्षांना मार्शल बोलावावे लागले. या घटनांदरम्यान भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष आणि आमदार अग्निमित्र पाल यांना निलंबित करण्यात आले. गोंधळाच्या वेळी घोष यांची प्रकृती बिघडली, त्यांना तत्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली.

हेही वाचा - Vladimir Putin : भारत, चीनवरील निर्बंधांच्या अमेरिकेच्या धोरणावर पुतिन यांची सडकून टीका; म्हणाले 'वसाहतवादी युग आता संपलंय...'

यानंतर मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी भाजपवर तीव्र हल्लाबोल केला. त्यांनी भाजपला 'मत चोरांचा पक्ष' असे संबोधले आणि आरोप केला की भाजप बंगालच्या भाषा व संस्कृतीवर वारंवार हल्ला करत आहे. स्वातंत्र्यलढ्यात बंगालने बलिदान दिले, तेव्हा भाजप अस्तित्वातही नव्हता. हे लोक बंगाली समाजावर अत्याचार करत आहेत.

हेही वाचा - Aslam Shaikh: ‘राज्यात इतर सणांना सुट्टी मिळते, मग मुस्लिम सणाला का नाही?’; 8 सप्टेंबर सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, असलम शेख यांची मागणी

दरम्यान, भाजपनेही ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार केला. भाजप आमदारांनी ममतांवर अल्पसंख्याक तुष्टीकरणाचा आरोप करत विधानसभेत जोरदार विरोध केला. या वादामुळे सभागृहातील वातावरण अधिकच तापले आणि काही काळासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. संपूर्ण घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चिघळले असून, तृणमूल आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री