मुंबई: अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जीएसटी काऊंसिलीची 56 वी बैठकी घेतली. या बैठकीत जीएसटीसंदर्भातील बरेच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीच्या माध्यमातून काही लोकांना दिलासा मिळाला आहे. तर काही जणांचे टेन्शन वाढणार आहे. काही वस्तूंवरील जीएसटी काढण्यात आला आहे, तर काहींना कमी जीएसटीच्या रांगेत बसवण्यात आले आहे. सरकारने चैनीच्या वस्तूंवरील जीएसटी वाढवला आहे. पनीर, पिझ्झा, खाकरा, भुजिया, पेस्ट, साबण, तेल आदी स्वस्त करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणात थेट जीएसटी कमी होणार असल्याचेही म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये मोठे निर्णय आल्याचे बघायला मिळाले.
आयपीएल सामान्यांबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्टेडियममध्ये जाऊन आयपीएल बघायला जाणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सरकारने आयपीएल सामन्यांच्या तिकिटावर मोठा जीएसटी लावण्यात आला आहे. याआधीही आयपीएलवर जीएसटी लावला होता. परंतु आता यात मोठी वाढ करण्यात आली आहे. देशात आयपीएल सामन्यावेळी पैशांची मोठी उलाढाल होते. परंतु आता स्टेडियममध्ये जाऊन आयपीएल बघणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
हेही वाचा: Amit Mishra Announces Retirement: अश्विननंतर आता लेग-स्पिनर अमित मिश्राने केली निवृत्तीची घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या अध्यक्षतेखाली 3 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत आयपीएल तिकिटांवरील जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेतला. आयपीएल सामन्याच्या तिकिटांवर 40 टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे. अगोदर या तिकिटांवर 28 टक्के जीएसटी होता आणि त्यात वाढ करुन 40 टक्के करण्यात आला. याचा अर्थ असा की, आयपीएल बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांच्या खिशावर मोठी भर पडणार आहे. उदा. समजा तुमच्या आयपीएल क्रिकेट सामन्याचे तिकिट हे 2000 रूपये आहे. तर त्या तिकिटावर आता 800 रूपये जीएसटी हा तुम्हाला भरावा लागले. त्यामुळे तुम्हाला अधिकचा जीएसटी भरून ते तिकिट 2800 रुपयांना पडेल.