Thursday, September 04, 2025 04:26:27 PM

NPCI Raises UPI Transaction Limit: UPI वापरकर्त्यांसाठी मोठी खुशखबर; आता 5 लाखांपर्यंत पेमेंट करता येणार

NPCI ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांची मर्यादा काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये 2 लाखांवरून थेट 5 लाख इतकी करण्याची घोषणा केली आहे. हा बदल 15 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे.

npci raises upi transaction limit upi वापरकर्त्यांसाठी मोठी खुशखबर आता 5 लाखांपर्यंत पेमेंट करता येणार

NPCI Raises UPI Transaction Limit: भारतामध्ये डिजिटल व्यवहारांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने गुरुवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. NPCI ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांची मर्यादा काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये 2 लाखांवरून थेट 5 लाख इतकी करण्याची घोषणा केली आहे. हा बदल 15 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे.

NPCI च्या मते, या वाढीव मर्यादेचा फायदा केवळ त्या व्यापाऱ्यांना मिळेल जे NPCI च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतील. तसेच, बँकांना त्यांच्या अंतर्गत धोरणांनुसार स्वतंत्रपणे व्यवहार मर्यादा निश्चित करण्याची मुभा देण्यात आली आहे, मात्र ती 5 लाखांपेक्षा जास्त असू शकणार नाही. 

हेही वाचा - GST Changes: GST च्या नवीन दरांचा सर्वसामान्यांवर परिणाम! काय स्वस्त आणि काय महाग झाले? जाणून घ्या संपूर्ण यादी

कोणत्या क्षेत्रांत 5 लाखांपर्यंत UPI पेमेंट करता येणार?

भांडवल बाजार
विमा
सरकारी ई-मार्केटप्लेस
प्रवास क्षेत्र
क्रेडिट कार्ड बिल पेमेंट
व्यापारी पेमेंट (पूर्व-मंजूर पेमेंटसह)
फॉरेक्स रिटेल (BBPS)
डिजिटल खाते उघडणे (FD साठी)

या क्षेत्रांत 2 लाखांपर्यंत पेमेंट करता येणार -  

दागिने खरेदी
डिजिटल खाते उघडणे (प्रारंभिक निधी)

हेही वाचा - Stock Market Today: GST दर कपातीच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 547 अंकांनी झेपावला, 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

डिजिटल इंडियाकडे मोठे पाऊल

UPI आधीच भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. दरमहा कोट्यवधी व्यवहार या प्रणालीद्वारे होत आहेत. NPCI च्या या निर्णयामुळे आता विमा प्रीमियम, भांडवल बाजारातील गुंतवणूक, प्रवास बुकिंग किंवा मोठ्या क्रेडिट कार्ड बिलांचे पेमेंट करणे अधिक सोपे होईल. डिजिटल व्यवहारांना चालना देऊन अर्थव्यवस्थेला गती देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. या नव्या मर्यादेमुळे ग्राहकांचा डिजिटल पेमेंटवरील विश्वास आणखी वाढेल, तसेच भारताला पूर्णपणे डिजिटल अर्थव्यवस्थेकडे नेण्याच्या प्रवासात हे एक मोठे पाऊल ठरेल.


सम्बन्धित सामग्री