Monday, September 01, 2025 06:29:58 PM

Air India Flight Security Threat : एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी! निम्म्या मार्गातून परतले न्यूयॉर्कला जाणारे विमान

एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकीची चिट्ठी मिळाल्यानंतर मुंबईहून न्यूयॉर्कला रवाना झालेले विमान अर्ध्या रस्त्यातून मुंबईला परतले. आता हे उड्डाण उद्या (11 मार्च) होणार आहे.

air india flight security threat  एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी निम्म्या मार्गातून परतले न्यूयॉर्कला जाणारे विमान

Air India Flight Security Threat : मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 320 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले आणि सुरक्षा एजन्सींकडून त्याची तपासणी केली जात आहे. एअर इंडियाने अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगितले आहे.

आज (10 मार्च) रोजी मुंबई-न्यूयॉर्क (जेएफके) विमान प्रवासादरम्यान AI119 विमानात संभाव्य सुरक्षेचा धोका आढळून आला. यानंतर विमानातील प्रवाशांची सुरक्षा विचारात घेत आवश्यक प्रोटोकॉलनुसार विमान परत मुंबईला वळवण्यात आले, अशी माहिती एअर इंडियाच्या निवेदनात देण्यात आली आहे. एका राष्ट्रीय वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा - Indian Railway's Beautiful Routes : भारतातले निसर्गसौंदर्यानं नटलेले हे रेल्वे मार्ग तुम्हाला माहीत आहेत का? प्रवासादरम्यान दिसतील नयनरम्य दृश्यं

धमकी असलेली चिठ्ठी आढळली

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या शौचालयात बॉम्बने उडवून देण्याची धमकी असलेली चिठ्ठी आढळून आली. या विमानात 19 क्रू मेंबर्ससह 322 प्रवासी प्रवास करत होते. एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, विमान मुंबई येथे सकाळी 10.25 वाजता सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

या घटनेनंतर विमानाच्या पुढील उड्डाणीची वेळ बदलण्यात आली आहे, उद्या म्हणजेच, 11 मार्च रोजी सकाळी 5 वाजता हे विमान पुन्हा उड्डाण करेल. तोपर्यंत सर्व प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, जेवण आणि इतर मदत देण्यात आली आहे, असे एअरलाइन्सने सांगितले.

सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता

एअर इंडियाने म्हटले आहे की, त्यांच्या प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. "या व्यत्ययामुळे प्रवाशांना होणारी गैरसोय कमीत कमी होईल याची खात्री करण्यासाठी आमचे सहकारी प्रयत्न करत आहेत. नेहमीप्रमाणे, एअर इंडिया प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते," असे एअरलाइन्सच्या निवेदनात म्हटले आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून न्यूयॉर्कमधील जॉन एफ. केनेडी विमानतळावर जाण्यासाठी मूळ नियोजित उड्डाणास साधारणपणे 15 तासांचा प्रवास करावा लागणार होता. 303 प्रवासी आणि 19 क्रू सदस्यांना घेऊन, बोईंग 777 ने अझरबैजानवरून आपला उड्डाणाचा मार्ग बदलला आणि हे विमान मुंबईला परत आले. लँडिंगनंतर, बॉम्ब शोधण्याच्या प्रक्रिया पार पाडण्यात आल्या. परंतु, नंतर ही धमकी खोटी असल्याची पुष्टी झाली.

हेही वाचा - Kedarnath Yatra : आता अवघ्या 36 मिनिटांत होईल केदारनाथ यात्रा; कॅबिनेटने दिली उत्तराखंडमधील 2 रोप-वे प्रकल्पांना मान्यता


सम्बन्धित सामग्री