Monday, September 01, 2025 02:35:49 PM

ब्रेकिंग! एअर इंडिया विमानातील सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू; DNA चाचणीनंतर पटणार मृतदेहांची ओळख

आतापर्यंत अपघातस्थळावरून 100 मृतदेह सापडले आहेत. बहुतेक मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे खूप कठीण आहे. डीएनए चाचणीनंतरच त्यांची ओळख पटवणे शक्य होईल.

ब्रेकिंग एअर इंडिया विमानातील सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू dna चाचणीनंतर पटणार मृतदेहांची ओळख
Ahmedabad Plane Crash
Edited Image

Ahmedabad Plane Crash Update: गुरुवारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान कोसळले. या अपघातात विमानातील सर्व 242 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानात होते. विमानात 242 प्रवासी होते. त्यापैकी 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. आतापर्यंत अपघातस्थळावरून 100 मृतदेह सापडले आहेत. बहुतेक मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे खूप कठीण आहे. डीएनए चाचणीनंतरच त्यांची ओळख पटवणे शक्य होईल.

हेही वाचा - Aeroplane Black Box: ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? ज्यावरून उलगडणार अहमदाबाद विमान अपघाताचे सत्य

आरोग्य प्रधान सचिव धनंजय द्विवेदी यांच्या मते, अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे डीएनए नमुने घेण्याची व्यवस्था अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलने केली आहे. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या कासोती भवनमध्ये डीएनए नमुने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांचे जवळचे नातेवाईक (पालक किंवा मुले) डीएनए नमुने देऊ शकतील. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या कासोती भवनमध्ये डीएनए नमुने घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे कासोती भवन बी.जे. मेडिकल कॉलेजच्या तळमजल्यावर आहे.

हेही वाचा - Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाचे विमान कसे कोसळले? समोर आला काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

रुग्णालयाचा आपत्कालीन क्रमांक

दरम्यान, अहमदाबाद विमान अपघातानंतर, रुग्णालय प्रशासनाने अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल ट्रॉमा (आपत्कालीन) केंद्रात रुग्ण-केंद्रित उपचारांशी संबंधित माहितीसाठी संपर्क साधण्यासाठी 6357373831 आणि
6357373841 हे दोन फोन नंबर जारी करण्यात आले आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री